हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये आयुष्य सुखी आणि संस्कारी बनवणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महान महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या मदतीने केली अशी मान्यता आहे. मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेले काही खास सूत्र आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मनुस्मृतीमधील एका श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कोणकोणत्या सात गोष्टी संकोच न बाळगता घेण्याचा प्रयत्न करावा.
श्लोक
स्त्रियो रत्नान्यथो विद्या धर्मः शौचं सुभाषितम्।
विविधानि च शिल्पानि समादेयानि सर्वतः।।
अर्थ - जेथे कोठूनही किंवा कोणाकडूनही (चांगला किंवा वाईट व्यक्ती, चांगली किंवा वाईट जागा इत्यादी गोष्टींकडे लक्ष न देता) 1. सुंदर स्त्री, 2. रत्न, 3. विद्या, 4. धर्म, 5. पवित्रता, 6. उपदेश तसेच 7. विविध प्रकारचे शिल्प मिळत असेल तर, या गोष्टी कोणताही संकोच न बाळगता प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.
या 7 गोष्टी घेताना संकोच का बाळगू नये हे जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...