आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानसिकदृष्ट्या खंबीर लोक या खोट्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे लोक मनाने खंबीर आहेत ते काही खोट्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाहीत. त्यापैकी काही गोष्टींबाबत सांगितले गेलेले आहे .या गोष्टी जाणून घेऊन तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर बनू शकता.
- एखादी गोष्ट याच पद्धतीने हवी होती ,याकडे ते कधीच लक्ष देत नाहीत. कोणती गोष्ट कशा पद्धतीने हवी आहे याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात काही आयडिया असते. ते कमीत कमी आशा ठेवतात आणि जास्तीत जास्त शिकतात.
- ही परिस्थिती फार वाईट आहे, यावर ते विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक परिस्थिती चांगलीच असते. ती जरी नसेल तरी ती चांगली बनविण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात.
- कोणतीच आशा शिल्लक नाही, त्यांना हे माहीत असतं की,पराभवाच्या उलट हिंमत नव्हे तर पराभवाच्या उलट असते आशा.
- आमच्याजवळ कोणताच पर्याय शिल्लक नाही. पण त्यांच्याकडे काम करण्याचे किंवा पुढे जाण्याचे अनेक पर्याय आहेत. पुढे जाण्यासाठी ते त्यापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करतात.
- यशस्वी लोक नियमांचे पालन करतात. पण अशा लोकांसाठी ही गोष्ट कधीच खरी असत नाही. जबाबदारी घ्यायला ते कधीच कचरत नाहीत.
- हे काम करण्यासाठी काही सोपा उपाय जरूर असेल. त्यांना हे माहीत असते की,चांगल्या जागी पोहोचण्यासाठी शॉर्टकट असत नाही.
- योग्य वेळ फक्त आताच आहे. जे लोक मनाने खंबीर आहेत, त्यांना प्रत्येक वेळ योग्य वेळेत बदलता येते. ते फक्त आतावरच विश्वास ठेवत नाहीत. पण प्रत्येक क्षण चांगला बनविण्याच्या प्रयत्नात राहतात.
- आनंदी राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज पडते. पण खंबीर लोकांना आनंदी राहण्यासाठी वस्तूंची गरज पडत नाही. ते नातेसंबंधामुळेच आनंदी राहतात,वस्तूंमुळे नाही.
- दुसर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी परफेक्ट असणे गरजेचे आहे,पण असे कधी असत नाही. त्यांना हे माहीत असते की दुसर्‍यांवर चांगला प्रभाव टाकण्यासाठी जसे आहात तसेच राहा,स्वत:ला बदलण्याची गरज नाही.