आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेशी संबंधित या 16 गोष्टी आयुष्य आणखी सुंदर बनवतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म शास्त्रामध्ये दिनचर्येशी संबंधित विविध गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. या गोष्टी आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी अशाच काही नियमांचे आणि गोष्टींचे पालन केल्यास आयुष्याला आणखी सुखी केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, झोपेशी संबंधित शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींबद्दल...

1. कोणत्याही मंदिरात किंवा स्मशानभूमीत झोपू नये.
2. कोरड्या पायांनी झोपणे समृद्धी वाढवणारे मानले गेले आहे. पाय ओले करून झोपू नये. पाण्यात पाय बुडवून झोपू नये.
3. झोपेतून उठल्यानंतर ज्याप्रमाणे आपण सर्वात पहिले देवाचे स्मरण करतो, त्याचप्रकारे झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करावे.
4. शास्त्रामध्ये झोपण्यापूर्वी एक प्रार्थना मंत्र सांगण्यात आला आहे.
जले रक्षतु वाराहः स्थले रक्षतु वामनः ।
अटव्यां नारसिंहश्च सर्वतः पातु केशवः ।।

हा एक रक्षा मंत्र असून याचा अर्थ, श्रीहरीने वेगवेगळ्या रुपात या ब्रह्मांडाचे रक्षण करावे. पाताळाची वराह देवाने रक्षा करावी. पृथ्वीची वामन रुपात रक्षा करावी. आकाशात नृसिंहने रक्षा करावी आणि श्रीकेशवाने सर्व दिशांची रक्षा करावी.

पुढे जाणून घ्या, झोपेशी सबंधित इतर काही खास गोष्टी....