आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : समाजसेवा करताना या गोष्टीकडे द्या विशेष लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप मध्य प्रदेशात पोहोचला. तेथे पोलिस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मी संपाच्या दरम्यान भाजीपाला विक्रेत्यांमध्ये एकजूट पाहिली आहे. मंगळवारी रात्री माझ्या लक्षात आले की, काही भाजीपाला पिकवणारे शेतकरी काही पैसे कमवण्याच्या हेतूने एकत्र आले होते. कारण, त्यांना आंदोलनालाही पाठिंबा द्यायचा होता. ते एका पॉश कॉलनीत एका बाजूला बसले. संपावर नजर ठेवणाऱ्या शेतकऱ्यांपासून ही जागा सातशे मीटर दूर होती. हे लोक पथदिव्यांच्या उजेडात भाजीपाला विकायला लागले. या लोकांच्या एका गोष्टीने माझे लक्ष वेधले. तो म्हणजे व्हाइट बोर्ड. मला वाटले की, हा एखाद्या राजकीय पक्षाचा बोर्ड असेल. कारण, तेथे कोणत्याच पक्षाचा झेंडा नव्हता. ही आयडिया कदाचित एका समाजसेवकाची असावी. या फलकावर भाज्यांच्या किमती लिहिल्या जाऊ शकत होत्या. येथे कुणीच कुणाशी बोलत नव्हते. लोक केवळ फलकावर लिहिलेल्या भाजीच्या किमती पाहत होते. ते केवळ एक किंवा अर्धा किलोच भाजी मागत होते. पैसे देते होते आणि चालले जात होते. मला माहीत होते की काही फ्लॅश डान्ससारखे नव्हते. यामध्ये लोक एकमेकाला ओळखत नव्हते. आश्चर्याची बाब ही होती की, ज्या व्यक्तीने बोर्डवर किंमत लिहिली होती, त्याचे छायाचित्र बोर्डाच्या एका बाजूला लावलेले होते. 

क्रमश:
बातम्या आणखी आहेत...