आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Story: काठोकाठ भरलेला कप आणि प्राध्यापक, वाचा जीवन बदलून टाकणारी झेनकथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेइजी युगातील (1868-1912) नान-इन नावाच्या एका झेन गुरूजवळ एका विद्यापीठाचे प्राध्यापक झेन तत्त्वज्ञान प्राप्त करण्यासाठी आले होते.

 

नान-इन यांनी त्यांच्यासाठी चहा बनवला आणि त्यांनी प्राध्यापकाचा कप भरण्यास सुरूवात केली. चहाचा कप काठोकाठ भरून चहा खाली बशीत पडायला लागला.

 

सुरूवातीला प्राध्यापक हे सर्व आश्चर्यचकीत होऊन पाहात होते, मात्र त्यांची अस्वस्थता वाढली आणि ते म्हणाले, "कप पुर्ण भरला आहे, आता यामध्ये अजून चहा नाही बसणार!"

 

तेव्हा नान-इन म्हणाले, "या कपाप्रमाणे तुमचे मन आणि बुध्दीसुध्दा तुमच्या विचारांनी आणि मतांनी पुर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मन आणि बुध्दी जोपर्यंत पुर्णपणे खाली करत नाही, तो पर्यंत मी तुम्हाला झेन तत्त्वज्ञान शिकवू शकत नाही.

#झेनकथा