आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्न करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण कोठून आलो, हा प्रश्न मला अनेकांनी विचारला. मी स्वत:लादेखील हा सवाल केला आहे. शरीरात येण्याच्या अगोदर आपण कोठे होतो? नंतर कोठे जाणार? आई-वडिलांच्या योगदानातून आपला जन्म होतो, असे मानणारा विज्ञानवादी वर्ग आहे; परंतु एक वर्ग जीवनाकडे अध्यात्माच्या दृष्टीने पाहतो.

माणसाच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी तरी येतो. त्याचे योग्य उत्तर मिळायला हवे. त्यामुळे येणे आणि जाण्यादरम्यान जीवन असते, याचा खराखुरा आनंद मिळू शकेल. त्याला नीटपणे समजून घेता आले नाही तर प्राप्त गोष्टींचाही दुरुपयोग होऊ लागेल. शास्त्रात ऋषी-मुनींनी याबाबत सतर्क केले आहे. आपले मूळ, जन्माचे कारण एकूणच ऊर्जेत आहे. ही एक शक्ती आहे. तिला रूप नाही. आकार नाही. ऊर्जेच्या मुद्द्यावर धर्म आणि विज्ञान यांच्यात सहमती होते. हीच ऊर्जा आई-वडिलांच्या वीर्याच्या कणाच्या रूपात आपल्या जीवनाला तयार करते. ही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. सतत वाहत असते.

आपण त्या ऊर्जेकडून येतो आणि ऊर्जेकडे जातो. त्या दरम्यान जीवन असते. म्हणूनच जीवनाला त्या ऊर्जेशी जोडले पाहिजे. ही ऊर्जा ब्रह्मांडभर वाहत असते. याच ऊर्जेच्या ज्या अंशातून आपला जन्म झाला आहे. ती आपल्या रोमाराेमातून वाहत आहे. एकांतात असताना शरीरातील सर्व एकाग्रता एका ठिकाणी आणल्याबरोबर आपण त्या परमतत्त्वाशी जोडले जातो.
बातम्या आणखी आहेत...