आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्दांबद्दलचे भान हाच श्रवणयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणूस कानाने ऐकतो, ही एक सामान्य स्थिती आहे; परंतु संपूर्ण शरीराचा कान होतो तेव्हा खरी मजा येते. जीवनातील सहज क्रियांना योगाशी कसे जोडावे? निद्रा, जागे होणे, झोपणे, पाणी पिणे याबद्दल चर्चा झाली. आता ऐकणे आणि बोलण्यावर लक्ष केंद्रित करू. तुम्ही ऐकता राहू शकत नाहीत. कधी-कधी तर जे ऐकायचे नाही, तेदेखील ऐकावे लागते ऐकण्याची इच्छा असलेल्या गोष्टी मात्र ऐकायला मिळत नाहीत. ऐकण्याची क्रिया योगाशी जोडण्यासाठी तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. तसे तर आपण एकाच वेळी संपूर्ण एेकत असतो; परंतु आता त्याला तीन टप्प्यांत वाटून घेऊया.

पहिला असेल- शब्दांना अातमध्ये वळवणे, दुसरा - शब्दांना आतमध्येच ठेवणे, तिसरा टप्पा- शब्दांचे उच्चारण करणे. जवळपास अशीच क्रिया प्राणायामामध्ये असते. कुंभक, रेचक, पूरक. श्रवणाचा पहिला टप्पा आतमध्ये घेण्याचा आहे. ही कला अवगत व्हायला हवी. एखादा बोलत असेल तेव्हा त्याचे शब्द कानापर्यंत पोहोचले पाहिजेत. कानाने श्रवण करण्याची कला तेवढी आपल्याला चांगल्याप्रकारे आत्मसात आहे. एका कानाने ऐकणे, दुसऱ्याने सोडून देणे. त्यासाठी काेणालाही अतिरिक्त काही शिकवण्याची गरज पडत नाही. कारण ही आपली सवय होऊन जाते. अर्थात, एका कानाने ऐकून दुसऱ्याने ते सोडून दिले जाते. वास्तविक,श्रवणातून शांती येऊ शकते; परंतु एका कानाने ऐकणे आणि दुसऱ्या कानाने त्याला सोडून देण्याची कला माणसाला चांगल्या प्रकारे अवगत झाली आहे. असाे. नीट ऐकून घेणे हीच एक निम्मी योग्यता आहे.