आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्द बेंबीच्या देठापासून निघावेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यग्र दिनचर्येत ज्यांना शांतता हवी त्यांनी योगाशी जोडले पाहिजे. मात्र, बहुतांश लोक योगाची शिस्त पाळू शकत नाहीत. यामुळेच मी इथे दिनचर्येसोबत योग जोडण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. तुम्ही कितीही व्यग्र असला तरी झोप, उठणे, खाणे, पिणे, ऐकणे आणि बोलणे ही कामे अवश्य कराल.

पाच कामे योगावर आपण चर्चा केली. आता सहावी चर्चा बोलण्यावर. बोलण्यासाठी पहिल्यांदा मौन हवे हे माहीत आहेच. त्यामुळे दिवसभर बाेलताना मौनाच्या संधी शोधत राहा. मौनाचा अर्थ विचारांचा प्रवेश रोखणे. कारण मन िवचारांना खेचतात आणि मौन भंग करतात. मनापर्यंत िवचार पोहोचल्यास मौन कमी होईल. याचा सराव अधेमध्ये केल्यास तुमचे विचार अनमोल आणि प्रभावी होतील. या सिद्धांतानंतर आता क्रिया समजून घेऊ. बोलणे योगाशी जोडायचे असेल तर तीन क्रिया आपल्या वाणीशी जोडा. पहिला टप्पा बेंबीपासून बोलणे, दुसरा घशातून बोलणे आणि तिसरा टप्पा जिभेने बोलणे.

पहिल्या टप्प्यातील अभ्यासात बोलताना सर्व लक्ष बेंबीकडे द्या आणि शब्द बेंबीतून निघतात याकडे लक्ष ठेवा. तुमच्या व्यग्रतेत अशा संधी मिळाल्यास बेंबीवर लक्ष केंद्रित करून आणि मंत्रोच्चार करावा. मग तो मंत्र गायत्री मंत्र, श्री हनुमान चालिसा असो की अन्य कोणता गुरू-मंत्र तुमच्या बेंबीशी सहज जोडतो. तुम्ही बेंबीच्या देठापासून बोलत असल्याची अनुभूती मिळेल. यानंतर जो कोणता शब्द बोलाल, आपले आई-वडील, मुले, जोडीदार आणि अन्य जे कोणते जवळचे लोक असतील, त्यांच्याशी बोलताना शब्द नाभीशी बेंबीरूपी केंद्रबिंदूतून काढा. या भावनेतून बोलत राहा. या पहिल्या टप्प्यात योग आपोआप कमी होत राहील.