आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाच गोष्टींमुळे दिसून येतील अद‌्भूत परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही परिश्रमातून एखादे मोठे काम करता. त्या वेळी काही लोक तुमच्या सोबत असतात. त्यात काही तुमचे सहकारी असतात. काही वरिष्ठ असतात. व्यवस्थापनाच्या दृष्टीने जे करता येईल. ते करायला हवे. परंतु अाध्यात्मिकदृष्ट्या पाच गोष्टी जरूर करा. एक काळ अर्थात काम करण्याच्या वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. कारण काळही हानी-लाभ प्रसंगानुरूप असतो. उदाहरणार्थ, भ्रमंतीसाठी सकाळची वेळ चांगली असते. दुसरी गोष्ट सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मानसिक स्तर माहीत असला पाहिजे. त्यांची इच्छा काय? ते तुमच्या सोबत का आहेत? त्यांचेही काही तरी ध्येय असेल. त्यांच्या आकांक्षा-महत्त्वाकांक्षाही असतील. कधी-कधी त्याचा लाभ त्यांना मिळायला हवा.

अाध्यात्मिकदृष्ट्या पंचतत्त्व-पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाशाचे महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा काही काम करता. त्यावेळी हे पंचतत्त्व तुमच्या सोबत असतात. त्याचा उपयोग आणि हानी कशा प्रकारे सहकाऱ्यांना होईल, याबद्दलचे भान राखले पाहिजे. स्त्री-पुरुष यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवे. परंतु मानसिक पातळीवर आंतरिक चिंतनात स्त्री आणि पुरुषात फरक असतो. पुरुषांच्या बाबतीत तुम्ही जे निर्णय घेता. ते महिला सहकाऱ्यांबाबत करता येत नाही. याबद्दल खबरदारी घ्यायला हवी. तुमच्या कष्टासोबत सहकाऱ्यांविषयीची ही जाणीव असली पाहिजे. त्यातून अद्‌भुत फलश्रुती पाहायला मिळेल.

पं.विजयशंकर मेहता