आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 कामांपासून प्रत्येकाने राहावे दूर, ही कामे केल्यास लवकर येते म्हातारपण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हणतात की, पहिले सुख निरोगी काया आणि दुसरे धन हे आहे. याचा अर्थ, मनुष्याजवळ कितीही पैसा असला तरी त्याचे शरीर स्वस्थ नसेल तर तो सुखी राहू शकत नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या गोष्टीच्या अभावामध्ये आनंदी राहणे शक्य आहे, परंतु शरीर रोगी असेल तर अपार सुख असूनही दुःख भोगावे लागते. शास्त्रामध्ये आरोग्याला धनापेक्षाही जास्त महत्त्व देण्यात आले आहे. कारण खराब स्वास्थ्य तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते.

शास्त्रामध्ये निरोगी शरीरासाठी नियमित आणि सुनियोजित दिनचर्येचा अवलंब करण्यास सांगितले आहे. ज्या लोकांची दिनचर्या नियमित नसते त्यांना लवकरच वृद्धत्वाचा सामना करावा लागतो. यासाठी गरुड पुराणातील आचारखंडमध्ये सांगण्यात आले आहे की...

अत्यम्बुपानं कठिनाशनं च धातुक्षयो वेगविधारणं च।
दिवाशयो जागरणं च रात्रौ षड्भिर्नराणां निवसन्ति रोगा:।।

अर्थ : दिनचर्येत हलगर्जीपणाची सहा कारणे तुम्हाला गंभीर आजारांनी ग्रस्त करून लवकर वृद्धावस्थेकडे घेऊन जातात.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कोणती आहेत ती सहा कामे....
(फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)