आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करून घेऊया प्रभूची ओळख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थान आणि गुजरातमधील एक प्रसिद्ध संत श्री दादब भगत यांच्यासंबंधी एक घटना प्रसिद्ध आहे. एका गावात एक माणूस होता. कामात मग्न, पण अभिमानी. त्याला कोणीतरी माहिती दिली की, गावात कोणी महात्मा आलेला आहे. त्याला वाटले जीवनाचा बराच काळ असाच घालवला. अगदी गावातच महात्मा आलेला आहे, तर त्या महात्म्याचे दर्शन घ्यावे. तो घोड्यावर निघाला. रस्त्यावर त्याला एक जण झाडे तोडताना दिसला. त्याला त्याने विचारले की, ‘दादू भगत कुठे असतात?’ झाड तोडणार्‍याने उत्तर न देताच आपले काम चालू ठेवले. त्याने असे एक-दोनदा विचारल्यावरही झाडे तोडणारा त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. तेव्हा रागाने तो घोड्यावरून उतरला आणि लाथांनी, चाबकाने त्याला बडवले आणि अपशब्द बोलत निघून गेला. पुढे जाऊन परत एका व्यक्तीला ‘दादू भगत कुठे भेटतील’ म्हणून त्याने विचारले. त्या व्यक्तीने उत्तर दिले की, ‘तुम्ही आलात त्या रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना काही झाडांचा त्रास होत असल्याने दादू भगत ती साफ करीत आहेत.’ हे ऐकून तो भयंकर दु:खी झाला, अजाणतेपणी आपल्याकडून पाप घडल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. परत येऊन त्याने झाडे तोडणार्‍याच्या रूपात असलेल्या दादू भगतची माफी मागितली.
दादू भगत यांनी त्याला हेच सांगितले की, ‘ते तुझे अज्ञान होते. त्या अज्ञानामुळेच तू असे केले. आता तू मला ओळखले आहे, आता येऊन नमस्कार करत आहेस. आता तर तू स्वत:ला नमवले आहेस. अज्ञानामुळेच तू दुर्व्यवहार करत होतास. त्यामुळे दोष तुझा नाही. तुझ्या अज्ञानाचा आहे. अज्ञानामुळेच माणूस भरकटतो. माणसाला सत्याची ओळख नसते, म्हणून तो असे कर्म करतो. सत्याचे ज्ञान झाल्यावर तो खर्‍या मार्गावर चालू लागतो..’ प्रभूची ओळख करून घेऊन या जगालाही याच मार्गावर चालवण्याचा प्रयत्न करणे हेच महापुरुषाचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक माणसाला प्रभूशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. ईश्वराशी जुळल्याने दुसर्‍यांबद्दलची ईर्षा, वैर मनातून निघून जाईल. प्रभूची ओळख न झालेला माणूस इतरांना नीच, त्याज्य समजेल. मात्र, सूर्योदय झाल्यावर प्रकाश पडतो तसा अज्ञानाचा अंधार दूर झाल्याबरोबर माणसाला सत्यतेची जाण होते. तो सन्मार्गावर येतो. ही भक्ताची महत्त्वाची पायरी असली, तरी ती अंतिम नाही, असे
निरंकारीबाबा सांगतात.