आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्याचे ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण हवे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली ज्ञानेंद्रिये ही आगीसारखी असतात. त्यांत काहीही टाकले तरी ती जळतात. विषारी पदार्थांच्या आगीतून प्रदूषण, दुर्गंधी निर्माण होते. परंतु, चंदन जाळल्यास त्याचा सुगंध आसमंतातही पसरतो. जो अग्नी जीवनाचा आधार असतो, तोच विनाशही करू शकतो. अग्नी ज्याप्रमाणे घराला ऊब देऊ शकतो त्याचप्रमाणे तो घरही भस्मसात करू शकतो. शेकोटीभोवती उत्सव साजरा केला जातो तर स्मशानातील आग दु:ख देत राहते. एखादा टायर जाळत असेल तर त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. मात्र, निरांजनामुळे तुमचे आयुष्य उजळून निघते. तुमच्यातील अग्नी धूर आणि प्रदूषण पसरवत असतो. अग्नीचे हे प्रकार नीट ओळखा. जेव्हा तुमची ज्ञानेंद्रिये चांगल्या कामात गुंतलेली असतात तेव्हा ती उजेड देतात व सुगंध पसरवतात. पण, जेव्हा ती वाइटात (अशुद्धात) गुंततात तेव्हा धूर आणि काजळीच पसरवतात.