आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्काम कर्म करण्याची प्रेरणा देते श्रीमद्भागवतगीता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा महाभारतातील युद्ध सुरु होणार होते, तेव्हा अर्जुनाने कौरवांसोबत भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य इ. ज्येष्ठ महानुभवांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल मनामध्ये स्नेह उत्पन्न झाल्यामुळे युद्ध करण्यास नकार दिला होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला. त्यानंतर अर्जुनाने न केवळ महाभारतातील युद्धामध्ये भाग घेतला तर ते युद्ध निर्णायक स्थितीपर्यंत पोहचवले.

श्रीमद्भागवतगीतेला आजही हिंदू धर्मामध्ये पवित्र ग्रंथ मानले जाते. गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने सृष्टीला धर्मानुसार कर्म करण्याची प्रेरणा दिली. वास्तविकतेमध्ये हा उपदेश भगवान श्रीकृष्णाने कलियुगातील मापदंड लक्षात घेऊन दिला आहे. काही लोक श्रीमद्भागवतगीतेला वैराग्याचा ग्रंथ समजतात, परंतु गीतेमध्ये ज्या वैराग्याचा उल्लेख करण्यात आला आहे ते एका कर्मयोगीचे आहे. कर्मही असे असावे ज्यामध्ये फळाची इच्छा नसावी म्हणजेच निष्काम कर्म.

गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की, निष्काम काम करून आपल्या धर्माचे पालन काणे हाच निष्काम योग आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की, आपण जे कोणतेही काम करतो ते पूर्णपणे मनातून, तन्मयतेने करावे. फळाची इच्छा करू नये. जर फळाच्या अभिलाषेने एखादे काम केल्यास ते सकाम कर्म म्हटले जाईल. गीतेची शिकवण आपल्याला सदैव निष्काम कर्म करण्याची प्रेरणा देते.