आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 लोकांपासून दूर राहावे, यांना नसते चांगल्या-वाईट गोष्टींची समज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथ खूप विस्तृत आहे. यामधील कथा जेवढा मोठ्या तेवढ्याच रोचक आहेत. शास्त्रामध्ये महाभारताला पाचवा वेद मानण्यात आले आहे. महर्षी वेद व्यासांनी या ग्रंथाविषयी स्वतः सांगितले आहे की - यन्नेहास्ति न कुत्रचित्. अर्थ - ज्या विषयाची चर्चा या ग्रंथामध्ये नाही, ती चर्चा कोठेही उपलब्ध नाही. या ग्रंथामध्ये एकूण एक लाख श्लोक आहेत, यामुळेच याला शतसाहस्त्री असेही म्हणतात. महाभारतच्या उद्योगपर्वत युद्धापूर्वी महात्मा विदुर राजा धृतराष्ट्र यांना लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात. यालाच विदुर नीती असेही म्हटले जाते. विदुर नीतीनुसार काही लोकांना चांगल्या-वाईट गोष्टींचे ज्ञान नसते, यामुळे यांच्यापासून दूर राहण्यातच फायदा आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांपासून आपण दूर राहावे...
कामुक व्यक्ती
विदुर नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीवर वासनेचा प्रभाव जास्त असेल तर त्याला चांगल्या-वाईट गोष्टींचे भान राहत नाही. कामुक व्यक्ती स्वतःच्या तृप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशा लोकांसोबत राहणार्‍या व्यक्तीलाही अनेकवेळा अपमानाला सामोरे जावे लागू शकते. नियमित अशा लोकांसोबत राहणार्‍या व्यक्तीला नेहमी संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणत्या नऊ लोकांपासून दूर राहावे...
बातम्या आणखी आहेत...