आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Habit Bad For Life According To Ramcharitmanas

अंगदने रावणाला सांगितल्या होत्या 14 वाईट सवयी, यापासून दूर राहावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या आणि सुखी जीवनासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागत नाही. स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही समान रुपात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न केल्यास भविष्यात भयंकर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसमधील लंकाकांडात रावण आणि अंगद या दोघांच्या संवादाचा एक प्रसंग सांगण्यात आला आहे. या संवादामध्ये अंगदने रावणाला सांगितले आहे की, कोणकोणते 14 दुर्गुण किंवा गोष्टी घडल्यास कोणत्याही व्यक्तीचे जीवन जिवंतपणी मृत्यू समान होते.

अंगदने रावणाला सांगितलेल्या या गोष्टी आजच्या काळातही लागू होतात. जर एखाद्या व्यक्तीमध्ये या 14 दुर्गुणांमधील एक दुर्गुनही आला तर तो मृतक समान होतो.

कामवश -
जो व्यक्ती अत्यंत भोगी, कामवासनेमध्ये लिप्त राहणारा असतो तो मृत्यू समान जीवन जगतो. ज्याच्या मनातील इच्छा कधीच संपत नाहीत आणि जो जीव फक्त आपल्या इच्छेच्या आधीन राहून जीवन जगतो, तो मृत्यू समान असतो.

वाम मार्गी -
जो व्यक्ती संपूर्ण जगाच्या उलट चालत असेल, जो संसारातील प्रत्येक गोष्टीमागे नकारात्मकता शोधत असेल, नियम, परंपरा आणि लोक व्यवहाराच्या विरुद्ध असेल त्याला वाम मार्गी म्हणतात. अशी कामे करणारे लोक मृत्यू समान मानले गेले आहेत.
पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, इतर खास गोष्टी...