देशभरात सध्या सूर्याच्या प्रकोपाने प्रचंड उष्णता जाणवत आहे. उन्हाळ्यात जास्तकाळ घराबाहेर फिरल्याने विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्या स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपल्या शरीरात पर्याप्त पाणी असणे आवश्यक आहे. शरीरात पर्याप्त पाणी असेल तर उष्णतेशी लढण्यास शक्ती मिळेल. उन्हामुळे आपल्या शरीरातून घामाच्या स्वरुपात पाणी बाहेर पडते. त्यामुळे उन्हाळ्यात वेळच्यावेळी पाणी पिणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांनी पाणी पिण्याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण नियम सांगिलते आहेत. आपण कोणत्या वेळी किती पाणी प्यावे, या गोष्टीकडे लक्ष दिल्यास चमत्कारिक स्वरुपात आरोग्य लाभ होतील.
- दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्यास पचनशक्ती नेहमी व्यवस्थित राहते. शरीराला उर्जा मिळते. पाचन तंत्र व्यवस्थित असेल तर व्यक्तीचे आयुष्य वाढते.
- दररोज स्नान केल्यानंतर एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे रक्त-संचार व्यवस्थित राहतो.
- दररोज झोपण्यापूर्वी कमीतकमी अर्धा ग्लास पाणी पिल्यास हृदय विकाराची शक्यता कमी होते.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पाण्याशी संबंधित खास गोष्टी आणि चमत्कारी उपाय...