आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान एक तरी जबाबदारी स्वीकारा, बदल नक्कीच घडेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही जर हे वाचत नसाल, तर मला काही म्हणायचे नाही; पण आपण हे वाचता आणि यापासून काही शिकत असाल, पण याची काही अंमलबजावणी करत नसाल तर हे योग्य नाही. जे ज्ञान अमलात आणलं जात नाही, ते ज्ञान म्हणजे एक ओझं आहे. ज्ञानाची अंमलबजावणी करण्यास आपण नेहमीच कचरतो. याला अव्यावहारिक असे म्हणतो. ज्या लोकांना ज्ञानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नको असते, अशा लोकांच्याच शब्दकोशात अव्यावहारिकता असा शब्द असतो. कमीत कमी एकदा तरी तुम्ही जबाबदारी घ्या, तुम्हाला जीवनात पूर्ण बदल दिसेल. जर एखादा अजाणतेपणे चूक करत असेल तर ती चूक आहे, पण कोणी जाणूनबुजून ही चूक करत असेल तर ते पाप आहे, गुन्हा आहे. चूक आणि पापात नेमके हेच अंतर आहे. एखादे काम चुकीचे आहे की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तर त्याच्यामागे हेतू काय आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चूक करणे एकवेळ क्षम्य, पण पाप करणे चुकीचे आहे. वंशपरंपरागत कारणांमुळे प्रकृती चांगली नसेल तर एकवेळ ठीक, पण स्वत:कडे दुर्लक्ष करून आजारी राहणे ठीक नाही. आरोग्यपूर्ण शरीर हे विकत घेतले जाऊ शकत नाही. तुमची प्रकृती ही तुमची जबाबदारी आहे.

नास्तिक असाल तर एकवेळ ठीक आहे, पण आस्तिक असतानाही भयाच्या सावटाखाली जगणे योग्य नाही. विश्वास आणि भीती दोन्ही एकाच ठिकाणी राहू शकत नाहीत. विश्वास आणि श्रद्धा नसेल तर तुम्ही कायम भयाच्या सावटाखाली राहाल. विश्वासाबाबत संशय घेऊ नका आणि संशयावर विश्वास ठेवू नका. भयमुक्त जीवन जगा. विश्वासाने जगा. बोलण्यामध्ये लक्ष यावर राहते की कोणती गोष्ट बरोबर आहे. वादविवादात हे समजते की, कोण बरोबर आहे. गप्पा किंवा गॉसिपमध्ये कोणतीच गाष्ट बरोबर असत नाही. गप्पांमध्ये दुसर्‍यांच्या भावनेशी आपण खेळतो. हे स्वत:च्या सत्यनिष्ठेशीही खेळल्याप्रमाणे आहे. जो तुमच्यासमवेत उपस्थित नाही, त्याच्यासंदर्भात काही बोलू नका. नकारात्मक तर अजिबात बोलू नका. दुसर्‍याचे दु:ख दूर करा. जर हेही करू शकत नसाल तर परिस्थितीपासून दूर राहा. अपयशी असाल तर ठीक आहे, पण अपयशाच्या भीतीने प्रयत्न करायचे सोडून देणे चुकीचे आहे. अयशस्वी झालात तर हरकत नाही, पण अयशस्वी होऊ या भीतीने मध्येच प्रयत्न सोडून देणे चुकीचे आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल, पण मातृभूमीला कधीही कमी समजू नका. मातृभूमी तुमच्या मातेप्रमाणे आहे.

तुम्ही आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेऊ शकत नसाल तर त्यात विशेष नाही, पण तुमच्या आयुष्यात सर्वकाही ठीक होत नाही, म्हणून दुसर्‍याला जबाबदार ठरवणे योग्य नाही. लोकांना जबाबदार ठरवल्याने प्रश्न सुटत नाहीत. कुणाचे पाय कापल्याने तुम्ही उंच होणार नाही. चित्राची गुणवत्ता ही चित्रकाराची जबाबदारी आहे. तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ही तुमची जबाबदारी आहे. जे तुम्ही करू शकत नाही, ते करू नका. जे आम्ही करू शकतो ते मात्र अवश्य करा. जर तुम्ही तुमच्यातील एकदम योग्य व्यक्तीला शोधू शकलात तर तुम्हाला बाहेरचे जगही योग्यच भासेल.

महात्रया रा
डिव्हायनर ऑफ द पाथ इनफिनिथिझम
mahatria@infinitheism.com