आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोलताना या गोष्टीकडे लक्ष दिल्यास पती-पत्नी राहतील प्रसन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैवाहिक जीवनात वाद-विवाद होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु या छोट्या-छोट्या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. जेव्हाही वादाची स्थिती निर्माण होईल तेव्हा पती-पत्नी दोघांनीही 'वाणीवर नियंत्रण' ठेवावे.

जेव्हाही वाणीच्या मर्यादेचे उल्लंघन होते तेव्हा छोटे-छोटे वाद मोठ्या भांडणाचे रूप घेतात आणि गृहस्थीमध्ये मानसिक तणाव जन्म घेतो. यामुळे जोडीदाराच्या मनावर आघात होईल अशा शब्दांचा वापर करू नये. भांडण झाल्यानंतर व्यक्ती सर्वात पहिले वाणीवरून घसरतो. त्यानंतर शरीर आक्रमक होते.
4 स्तरांवर होऊ शकतो वाद
1. विचारांच्या स्तरावर - जेथे तुम्ही सल्ले देण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करता.
2. भावनांच्या स्तरावर - यामध्ये प्रेम आणि संवेदना असतात तरीही भांडण चालूच असते. असे पती-पत्नीमध्ये आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये जास्त प्रमाणात होते.
3. क्रोधाच्या स्तरावर - या स्तरावर आपण कोणत्याही गोष्टीसाठी सहमत नसतो. आपला विरोध या क्रोधासोबत प्रकट केल्यामुळे भांडण अधिकच वाढत जाते.
4. सूचनेच्या स्तरावर - यामध्ये वाद चालू असताना एकतर आपण एखादी सूचना, संदेश किंवा आदेश देत असतो.

वैवाहिक जीवनात वाद कोणत्याही स्तरावर असो कोणीही अपशब्द वापरू नयेत. आवेशात येउन मोठमोठ्याने बोलू नये. यामुळे नात्यामधील दुरावा वाढत राहतो. वादाचा मुद्दा बाजूलाच राहतो आणि नको त्या शब्दांमुळे मन दुःखी होते.
बातम्या आणखी आहेत...