आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदुर नीती : तुमच्याकडे या 6 गोष्टी असतील, तर तुम्ही भाग्यशाली आहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतामध्ये धृतराष्ट्रचे मंत्री विदुर यांनी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयोगी नव्हत्या तर आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि प्रसन्न राहू शकते. विदुर नीतीनुसार ज्या मनुष्याजवळ या 6 गोष्टी असतात, तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो. खालील श्लोकाच्या माध्यमातून विदुराने या सहा गोष्टी सांगितल्या आहेत...

अर्थोगमो नित्यमरोगिता च, प्रिया च भर्या प्रियवादिनी च।
वश्यच्श्र पुत्रोर्थकरी च विद्या, षड् जीवलोकस्य सुखानी राजन्।।

अर्थ - धन, नित्य निरोगी, स्त्री अनुकूल, प्रियवादिनी असणे, पुत्र आज्ञाधारक आणि धन प्रदान करणाऱ्या विद्येचे ज्ञान असणे. या सहा गोष्टी मनुष्याला सुख प्रदान करतात.

विदुर नीतीच्या इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...