आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यास नोकरीत होऊ शकतो लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑफिसमध्ये कामाचा एवढा ताण असतो की कर्मचारी निराशा आणि क्रोधामध्ये बुडू लागतात. याचा वाईट प्रभाव प्रमोशन आणि इन्क्रिमेंटवर पडतो. अशावेळी लक्षात ठेवा या 4 गोष्टी...

1. कामाच्या ठिकाणी डोके शांत ठेवा
2. शुभचिंतकांचा सल्ला ऐका.
3. क्रोध आणि अहंकाराचा त्याग करा.
4. सर्वांचे काम प्रेमाने करा.

आजकाल कर्मचारी केवळ रिझल्ट ओरिएंटेड झाले आहेत. मनासारखे काम झाले नाही, काम वेळेवर पूर्ण झाले नाही की मग येथूनच क्रोध आपल्या कामामध्ये प्रवेश करतो. नेहमी लक्षात ठेवा की, दबावात न केलेल्या कामाचेच यश उत्तम असते. कामामध्ये दबाव असावा परंतु तो प्रेमाचा. या दबावामध्ये क्रोध नसावा. काही लोक केवळ स्वतःवरच विश्वास ठेवतात, इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांना इतरांनी सल्ला देणे आवडत नाही. लक्षात ठेवा, एखादा छोट्या पदावरील कर्मचारी तुमच्या फायद्याचा सल्ला देऊ शकतो.

पुढे वाचा, रावणाकडून कशाप्रकारे समजू शकता या चार गोष्टींचे महत्त्व...