वाईट सवयी कोणत्याही व्यक्तीचे आयुष उद्ध्वस्त करू शकतात. इतिहास आणि वर्तमान काळामध्ये असे विविध उदाहरणे आहेत, ज्यामध्ये वाईट सवयींमुळे मनुष्याचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही वाईट सवयी समाप रुपात हानिकारक आहेत. जर स्त्रीला वाईट सवयी असतील तर तिचे आयुष्य नष्ट होते, त्याचबरोबर तिच्या कुटुंबावरही वाईट प्रभाव पडतो. एक स्त्री, दोन कुटुंबाचा मान असते. एक कुटुंब म्हणजे तिचे माहेर आणि दुसरे सासर. स्त्रीच्या वाईट सवयी, वागणुकीमुळे दोन्ही कुटुंबाला समाजात अपयशाचा सामना करावा लागू शकतो.
शास्त्रामध्ये स्त्रियांसंबंधी विविध महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे कुटुंबाचा मान कायम राहील तसेच स्त्रिया स्वतः मानाने जीवन व्यतीत करू शकतील. काही नियम असे आहेत, ज्यापासून स्त्रियांनी नेहमी दूर राहावे.
शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
द्वारोपवेशनं नित्यं, गवाक्षेण निरीक्षणम्।
असत्प्रलापो हास्यञ्च, दूषणं कुलयोषितम्।।
अर्थ - कोणत्याही स्त्रीने विनाकरण घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहू नये. जर एखादी स्त्री जास्त वेळ विनाकारण दरवाजासमोर व्यर्थ उभे राहत असेल तर समजात तिला अपयश प्राप्त होते.
पुढे जाणून घ्या, या श्लोकामध्ये सांगण्यात आलेल्या आणखी काही खास गोष्टी...