आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंजारा समाजाची आगळीवेगळी होळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंजारा समाजात होळी सणात धुंड आणि गेर ही एक पद्धत वेगळी आहे. धुंडविषयी बंजारा लोकांची एक दंतकथा आहे. पूर्वी एक धुंडी नावाची राक्षसीण रात्री तांड्यात येऊन लहान बाळांना खात असे. कंटाळून तांड्यातील बंजारी लोक नायकाकडे सभा भरवतात. सर्वजण त्या राक्षसिणीस मारण्याचे ठरवतात. एका पौर्णिमेच्या रात्री लाठ्याकाठ्या, गोफण घेऊन सर्व जण जमा होतात. नेहमीप्रमाणे राक्षसीण तांड्यात येते व बंजारा टोळी पाहून नायकाच्या घरात घुसते. नायकाच्या घरातून बाहेर काढून सर्वजण राक्षसिणीला ठार करतात आणि तिची होळी करतात. अशा प्र्रकारे लहान बाळांच्या जीवनावरील धोका टळला आणि राक्षसिणीचा अंत झाला म्हणून बंजारा लोक होळी सण साजरा करतात, अशी एक दंतकथा आहे. वर्षभरात जन्मलेल्या मुलांचा ‘धुंड’ (वाढदिवस) साजरा करतात. अशी असते आगळीवेगळी बंजारा होळी.