आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, होळी हा सण कसा साजरा करतात ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीच्या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून त्यामध्ये शेणाच्या गव-या, एरंडाच्या झाडाची एक फांदी उभी करावी. त्याभोवती लाकडे, शेणाच्या गव-या रचून त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवद्य दाखवावा. नंतर होळी पेटवावी.

नंतर हातात पाणी घेऊन 'मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो' असा संकल्प करावा. घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्यानंतर खाली दिलेला मंत्र म्हणून तीन प्रदक्षिणा घालाव्यात.

मंत्र
अस्तपाभयसंत्रस्तै:कृत्वा त्वं होलि बाहलशै:|
अतस्त्वा पूजयिष्यामी भुते भूतिप्रदा भवः ||


खोब-याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद वाटावा.तसेच घरात त्रास देणाऱ्या जीव कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे ते किटाणू नष्ट होतात.