आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान: कॉम्प्युटर हाताळताना घेतली नाही काळजी तर होईल हा आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहिती तंत्रज्ञानाच्‍या युगात काम करण्‍याच्‍या पद्धती बदलल्‍या आहेत. कामाचा निपटारा करण्‍यासाठी तासनतास कॉम्प्युटरसमोर बसावे लागते. तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून काम केल्‍यामुळे शारीरीक थकव्‍याबरोबर मानसिक थकावा येतो. या थकव्‍यामुळे सा‍‍माजिक व वयक्तिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. कॉम्‍प्‍युटर जास्‍त वापरामुळे आरोग्‍यावर परिणाम होत असल्‍योच स्‍पष्‍ट झाले आहे. जास्‍त काळ कॉम्प्युटरसमोर बसून काम केल्‍यामुळे विविध आजार होत असल्‍याचे संशोधकांना आढळून आले आहे. काम करताना काळजी घेतल्‍या नंतर या आजारापासून स्‍वत:चा बचाव करता येतो. कॉम्प्युटरचा चुकीच्‍या पद्धतीने वापर केला तर 'कार्पल टनल सिंड्रोम' नावाच आजार होतो. या आजारापासून बचाव करण्‍यासाठी माऊस हाताळताना योग्‍य ती काळजी घ्‍यावी लागते. या आजारापासून बचाव करण्‍यासाठी माऊसचा कमीत-कमी वापर करा.
काय आहेत या आजाराची लक्षण-
मनगटाचा भाग सुन्‍न पडतो.
हाताला मुंग्‍या येतात.
मनगटाजवळचा भाग वारंवार सुजतो.
अंगठा किंवा करंगळीला अचानक वेदना होतात.
यावर लवकर उपाय केला नाही तर वारंवार अशक्‍तपणा यायला लागतो. यामुळे कामाला योग्‍य तो न्‍याय देता येत नाही.
या आजारावरील उपाय-
काम करताना कॉम्‍प्‍युरसमोर चुकीच्‍या पद्धतीने बसू नका. हाताचा वापर योग्‍य पद्धतीने करा.
काम करताना रेस्‍टगार्डचा वापर करा. यामुळे मनगटावर तान पडणार नाही.
काही तास काम केल्‍यांनतर थोडा आराम करा.
तासनतास कॉम्प्युटरसमोर बसू नका.
जर तुम्‍हाला या आजाराची लक्षणे दिसत असतील तर रेस्‍ट गार्ड किंवा मनगटाला क्रेप बँडेज बाधा. खूपच त्रास होत असेल तर मनगटामध्‍ये कार्टीसोन चे इंजेक्‍शन घ्‍या यामुळे मनगटाला आणि शरीराला आराम मिळेल.