Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Hanuman Jayanti 2018

या गावात नाही होत हनुमानाची पूजा, लाल झेंडा लावण्यावर ही आहे बंदी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 31, 2018, 04:23 PM IST

हनुमान हिंदू धर्मतील सर्वात जास्त पूजा करण्यात येणारे देव आहे. यामुळे त्यांना कलयुगातील जिवंत देव देखील म्हणतात. धर्म ग

 • Hanuman Jayanti 2018

  यूटिलिटी डेस्क- हनुमान हिंदू धर्मतील सर्वात जास्त पूजा करण्यात येणारे देव आहे. यामुळे त्यांना कलयुगातील जिवंत देव देखील म्हणतात. धर्म ग्रंथांनुसार, हनुमानाच्या पुजेतून सर्व समस्यांचे समाधान शक्य आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? एक गाव असे देखील आहे, जिथे हनुमानाची पुजा करण्यावर बंदी आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्या गावाविषयी सांगत आहोत.


  पुढील स्लाइडवर वाचा, येथे वर्ज आहे हनुमानाची पूजा.... येथे आहे संजीवनी वनस्पतीचा पर्वत...

 • Hanuman Jayanti 2018

  येथे वर्ज आहे हनुमानाची पूजा....


  उत्तराखंडच्या सीमावर्ती भागातील चमोली येथील जोशीमठ प्रखंण्डमध्ये जोशीमठ नीति मार्गावरील द्रोणागिरी गाव आहे. हे गाव साधारणत: 14000 फूट उंचीवर वसलेले आहे. येथील लोकांमध्ये मान्यता आहे की, रावणाचा पूत्र मेघनाथने लक्षमनाला जखमी केले होते. त्यावेळी हनुमानाने जो पर्वत उचलून नेला होता, तो याच गावात होता. द्रोणागिरीचे लोक या पर्वताची पूजा करत होते. हनुमानाने हा पर्वत उचलून नेल्याने ते नाराज झाले. याच कारणामुळे आज देखील येथे हनुमानाची पूजा होत नाही. एवढेच नाही तर या गावात लाल रंगाचा झेंडा लावण्यावर देखील बंदी आहे.

 • Hanuman Jayanti 2018

  येथे आहे संजीवनी वनस्पतीचा पर्वत...
  श्रीलंकेच्या सुदूर परिसरात श्रीपद नावाचा एक पर्वत आहे. अशी मान्यता आहे की, हा तोच पर्वत आहे, जो हनुमानाने संजीवनी वनस्पतीसाठी उचलून आनला होता. या पर्वताला एडम्स पीक देखील म्हटले जाते. हा पर्वत जवळपास 2200 मीटर उंचीवर स्थित आहे. श्रीलंकेचे लोक या पर्वताला रहुमाशाला कांडा असे म्हणतात. या पर्वतावर एक मंदिर देखील बनवण्यात आले आहे.

   

Trending