Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | today World Environment Day, know how we exploit our earth

World Environment Day: निसर्गाचे शोषण इतके वाढले की आणखी 4 पृथ्वींची गरज

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 05, 2018, 07:47 AM IST

आपण एका वर्षात जवळपास ८८ अब्ज टन नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करतो. याचाच अर्थ आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात याचा वापर होत

 • today World Environment Day, know how we exploit our earth

  ५० अब्ज टन नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर अपेक्षित, प्रत्यक्षात ८८ अब्ज टनांचा वापर
  आपण एका वर्षात जवळपास ८८ अब्ज टन नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करतो. याचाच अर्थ आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात याचा वापर होत आहे. वास्तविक पाहता जास्तीत जास्त ५० अब्ज टनांपर्यंतच नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होणे अपेक्षित आहे. विकसित देशांत तर २८ टन संपत्तीचा वापर केला जातो. जगातील इतर देशांनी वापर वाढवला तर आजच ४ पृथ्वींची गरज भासणार आहे.


  परिणाम काय? दरवर्षी १.९ कोटी लोकांचा होतोय अवेळी मृत्यू
  डिसेंबर २०१७ मध्ये बायोमास, जीवाश्म इंधन आणि गैरधातू खनिजांचे उत्खनन ८८.६ अब्ज टन झाले आहे. १९७० च्या तुलनेत ही संख्या तिपटीने वाढली. अशीच स्थिती राहिली तर २०५० पर्यंत नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर दुपटीहून अधिक होईल. साधनसंपत्तीचा बेसुमार वापर होत असल्याने पर्यावरणात बदल होत असून दरवर्षी १.९ कोटी लाेकांचा अवेळी मृत्यू होत असल्याची माहिती या अहवालात दिली आहे.

  पुढील स्‍लाइडवर, निसर्गाचे कसे शोषण करत आहोत आपण? जाणून घ्या पाच अत्यंत महत्त्वाच्या बाबी...

 • today World Environment Day, know how we exploit our earth

  पाणी

  जगातील एकूण पाण्यापैकी ९७.५% खारे पाणी समुद्रात आहे. १.५% पाणी बर्फाच्या रूपात, तर १% पाणी पिण्यायोग्य आहे.
  - २०२५ पर्यंत भारतातील निम्म्या आणि जगातील १.८ अब्ज लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार नाही.

 • today World Environment Day, know how we exploit our earth

  इंधन

  एका अंदाजानुसार भारतात प्रति हजार लोक रोज ४२० लिटर पेट्रोलचा वापर करतात. प्रत्येक व्यक्ती दर महिन्याला १५ लिटर पेट्रोल वापरते.   
  - पृथ्वीवर आता केवळ ५३ वर्षांपर्यंत पुरेल इतकेच इंधन उरले आहे.

 • today World Environment Day, know how we exploit our earth

  गॅस

  बीपी स्टॅटेस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी २०१६च्या अहवालानुसार, जगात वेगाने गॅसच्या साठ्याचा वापर होत आहे.
  - याच वेगाने नैसर्गिक गॅसचा वापर सुरू राहिला तर  नैसर्गिक गॅसचा साठा ५२ वर्षांत संपणार आहे.

 • today World Environment Day, know how we exploit our earth

  कोळसा

  जीवाश्म इंधनात जास्त साठा कोळशाचा आहे. पण चीन, अमेरिका आणि इतर देश याचा अधिक वापर करत आहेत.  
  - अशीच स्थिती कायम राहिली तर जगातील कोळशाचा साठा ११४ वर्षांत संपणार आहे.

 • today World Environment Day, know how we exploit our earth

  जमीन

  अन्न सामग्री आपणाला मातीतून मिळते. मातीतील सुपीकता संपत आहे. मागील ४० वर्षांत कृषीयोग्य ३३% जमीन नष्ट झाली आहे.
  - मागील २० वर्षांत जगात कृषी उत्पादकता जवळपास २० टक्क्यांपर्यंत घटली.

 • today World Environment Day, know how we exploit our earth

  निसर्ग वर्षभरात जे निर्माण करतो आपण केवळ ७ महिन्यांत ते सर्व संपवतो

Trending