Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Bagalamukhi Jayanti 2018, Bagalamukhi Mantra, Bagalamukhi Measures

23 एप्रिलला तिजोरीत अशाप्रकारे ठेवा हळकुंड, दूर होईल पैशाची तंगी

रिलिजन डेस्क | Update - Apr 23, 2018, 10:56 AM IST

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला बगलामुखी जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.

 • Bagalamukhi Jayanti 2018, Bagalamukhi Mantra, Bagalamukhi Measures

  वैशाख मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला बगलामुखी जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 23 एप्रिल, सोमवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, प्राचीन तंत्र ग्रंथांमध्ये दहा महाविद्यांचा उल्लेख आढळून येतो. देवी बगलामुखी यामधीलच एक आहे. शत्रूंचा नाश आणि तंत्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी या देवीची पूजा केली जाते. बगलामुखी जयंतीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास देवीच्या कृपेने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हे उपाय खालीलप्रमाणे आहेत.


  1. बगलामुखी देवीच्या पूजेमध्ये हळकुंड अर्पण करावे. त्यानंतर हे हळकुंड धनस्थानवर ठेवावे. यामुळे पैशाशी संबंधित समस्या नष्ट होतील.
  2. बगलामुखी देवीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि दिव्यामध्ये थोडीशी मोहरी टाकावी.
  3. देवीला पिवळे वस्त्र, पिवळे फळ, आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. यामुळे भक्ताला देवीची कृपा प्राप्त होऊ शकते.


  इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Bagalamukhi Jayanti 2018, Bagalamukhi Mantra, Bagalamukhi Measures

  4. हळदीच्या माळेने खालील मंत्राचा विधिपूर्वक जप करावा. लक्षात ठेवा, चुकीच्या पद्धतीने केलेला जप नुकसानदायक ठरू शकतो.
  मंत्र- श्रीं ह्रीं ऐं भगवति बगले में श्रियं देहि देहि स्वाहा
  5. बगलामुखी जयंतीच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी बगलामुखी यंत्राची स्थापना करून दररोज या यंत्राची पूजा करावी.
  6. तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून धोका असल्याची भीती असल्यास खालील मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने जप करावा. त्यानंतर देवीला पिवळे वस्त्र आणि हळकुंड अर्पण करावे.
  मंत्र- ऊं ह्लीं ह्लीं ह्लीं बगले सर्व भयं हन

Trending