घराबाहेर काढा कोळसा / घराबाहेर काढा कोळसा किंवा काजळाने हे काळे चिन्ह, दूर होईल वाईट काळ

Apr 08,2018 12:01:00 AM IST

घरामध्ये स्वस्तिक काढण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. स्वस्तिक गणेशाचे प्रतीक चिन्ह आहे आणि प्रत्येक शुभ करण्यापूर्वी हे चिन्ह काढल्याने यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते. सामान्यतः लाल स्वस्तिक प्रत्येक ठिकाणी काढले जाते परंतु आपण काळे स्वस्तिक घराबाहेर काढावे. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार काळे स्वस्तिक काढल्याने कोणकोणते लाभ होतात.


काळ्या स्वस्तिकाने दूर होते वाईट नजर
ज्याप्रकारे लाल रंगाचे स्वस्तिक घराच्या सुख-समृद्धीचे प्रतीक आहे, ठीक त्याचप्रकारे कोळसा किंवा काजळाने काढलेले स्वस्तिक वाईट नजर आणि वाईट काळाला दूर ठेवते. पं. शास्त्री यांच्यानुसार घराबाहेर काळे स्वस्तिक काढल्याने वाईट शक्तीपासून रक्षण होते. काळे स्वस्तिक घराजवळील नकारात्मकता ग्रहण करून सकारात्मकता वाढवते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, काळ्या स्वस्तिकाचे इतर काही खास फायदे...

असे धारण करा काळे स्वस्तिक एखाद्या शुभ मुहूर्तावर भोजपत्रावर कोळसा किंवा काजळाने स्वस्तिक चिन्ह काढावे. त्यानंतर या भोजपत्राचे तावीज बनवून हे गळ्यात धारण करावे. गळ्यात हे भोजपत्र धारण केल्याने व्यक्तीला कोणाचीही वाईट दृष्ट लागत नाही आणि कामातील बाधा दूर होतात.लाल स्वस्तिकाच्या खास गोष्टी सामान्यतः लोक घराच्या प्रवेशद्वारावर कुंकुवाने स्वस्तिक काढतात. स्वस्तिक अत्यंत पवित्र आणि शुभ चिन्ह मानले जाते. ज्या घरावर स्वस्तिकचे चिन्ह असते त्या घरावर नेहमी सर्व देवतांची कृपा राहते अशी मान्यता आहे.स्वच्छतेकडे द्यावे विशेष लक्ष घरामध्ये ज्याठिकाणी स्वस्तिक काढलेले असेल तेथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. अस्वच्छ ठिकाणी स्वस्तिक काढू नये. असे केल्यास याचा घरावर वाईट प्रभाव पडतो.
X