Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Benefits Of ekakshi Naral

अत्यंत खास राहते हे नारळ, यामध्ये धनाला आकर्षित करण्याचा आहे गुण

रिलिजन डेस्क | Update - Jun 05, 2018, 02:05 PM IST

हिंदू पूजेमध्ये नारळाचे विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण मानली जात नाही.

 • Benefits Of ekakshi Naral

  हिंदू पूजेमध्ये नारळाचे विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण मानली जात नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये नारळाचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. एकाक्षी नारळही त्यामधीलच एक आहे. एक नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार हे नारळ सहजपणे मिळत नाही. हजार नारळांमध्ये एखादे नारळ असे असते. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असते तेथे देवी लक्ष्मी स्वतः निवास करते अर्थात धन आणि सुख-संपत्तीची कमतरता राहत नाही. येथे जाणून घ्या, कसे असते एकाक्षी नारळ आणि याचे उपाय...


  कसे असते एकाशी नारळ
  हे नारळ दिसायला सामान्य नारळाप्रमाणे दिसते परंतु यावर डोळ्यासारखे एक चिन्ह असते. यामुळे याला एकाक्षी (एक डोळा असलेले) नारळ म्हणतात. हे नारळ घरात ठेवल्याने विविध अडचणी आपोआप दूर होऊ शकतात.


  हे आहेत एकाक्षी नारळाचे उपाय
  1. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची नियमित पूजा होते, त्या घरावर तांत्रिक क्रियांचा प्रभाव राहत नाही. कुटुंबातील सदस्यांना मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होते.
  2. दिवाळीच्या रात्री एकाशी नारळाची पूजा करून हे देवघरात स्थापित केल्यास धन संबंधित कामामध्ये फायदे होऊ शकतात.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • Benefits Of ekakshi Naral

  3. एकाक्षी नारळ सिद्ध करून घर किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवल्यास कायम बरकत राहते.
  4. एखाद्या विशेष कामासाठी घराबाहेर पडताना एकाक्षी नारळाची पूजा केल्याने त्या कामामध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते.

   

Trending