Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Benefits Of Raksha Sutra On Wrist

मनगटावर लाल धागा बांधून करा या एक मंत्राचा जप, दूर होतील सर्व अडचणी

रिलिजन डेस्क | Update - Jun 26, 2018, 02:29 PM IST

पूजा-पाठ करताना मनगटावर लाल दोरा (धागा, मौली, गंडा) बांधण्याची प्रथा आहे. यालाच रक्षासूत्र असेही म्हणतात.

 • Benefits Of Raksha Sutra On Wrist

  पूजा-पाठ करताना मनगटावर लाल दोरा (धागा, मौली, गंडा) बांधण्याची प्रथा आहे. यालाच रक्षासूत्र असेही म्हणतात. याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. मनगटावर धागा बांधताना आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचे स्मरण करावे. याशिवाय तुम्ही ऊँ गं गणपतयै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करू शकता. या उपायाने देवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि हा धागा आपल्याला विविध आजारांपासून वाचवतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मनगटावर धागा बांधल्याने कोणकोणते लाभ होऊ शकतात...


  # मौली बांधल्याने दूर होतात त्रिदोष
  पं. मनीष शर्मा यांच्यानुसार मनगटावर लाल धागा (मौली) अशा ठिकाणी बांधला जातो, जेथून आयुर्वेदाचे जाणकार वैद्य पल्स चेक करून आजाराविषयी सांगतात. शरीर विज्ञानाच्‍या दृष्‍टीने पाहिल्‍यास हातात धागा बांधल्‍याने उत्तम आरोग्‍य प्राप्‍त होते. शरीराचे त्रिदोष म्‍हणजे वात, पित्त आणि कफावर नियंत्रण मिळवता येते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लाल धागा मनगटावर बांधण्याचे इतर फायदे...

 • Benefits Of Raksha Sutra On Wrist

  # त्रिदेव आणि तीन देवींची कृपा प्राप्त होते...
  हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, हवन करताना ब्राम्‍हण आपल्‍या हातात लाल धागा बांधतात. हा धागा बांधल्‍याने त्रिदेव म्‍हणजे ब्रह्मा, विष्‍णु, महेश त्‍याचबरोबर तीन देवी- लक्ष्‍मी, पार्वती आणि सरस्‍वतीची कृपा प्राप्‍त होते. ब्रह्माच्‍या कृपेने कीर्ती, विष्‍णुच्‍या कृपेने ताकद आणि महादेवाच्‍या कृपेने दुर्गुणांचा विनाश होतो. त्‍याचप्रमाणे लक्ष्‍मीकडून धन, दुर्गेपासून शक्ति आणि सरस्‍वतीपासून बुद्धी प्राप्‍त होते.

 • Benefits Of Raksha Sutra On Wrist

  # प्राचीन काळापासून चालत आली आहे ही प्रथा 
  मौलीचा शाब्दिक अर्थ आहे सर्वात वर, याचा अर्थ आपल्या डोक्याशीसुद्धा आहे. महादेवाच्या डोक्यावर चंद्र विराजमान आहे, यामुळे महादेवाला चंद्रमौलिश्वर असेही म्हटले जाते. मौली बांधण्याची प्रथा सर्वात पहिले दानवीर राजा बळीच्या अमरत्वासाठी भगवान वामन यांनी बळीच्या मनगटावर पहिले रक्षासूत्र बांधले होते.

Trending