आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तिक काढताना चुकूनही करू नयेत या 3 चुका, अन्यथा घडू शकते अशुभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही शुभ कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होते. गणेशाचे प्रतीक चिन्ह स्वस्तिक काढले जाते. मान्यतेनुसार स्वस्तिक काढल्याने कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मकता वाढवते. उज्जैनच्या ज्योतिषाचार्य डॉ. विनिता नागर यांच्यानुसार स्वस्तिक काढताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, अन्यथा कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि काहीतरी अशुभ घडण्याचे योग जुळून येतात.


# उलटे स्वस्तिक काढू नये
लक्षात ठेवा, कधीही मंदिराव्यतिरिक्त इतर ठिकाणी उलटे स्वस्तिक काढू नये. मंदिरामध्ये उलटे स्वस्तिक विशेष इच्छापूर्तीसाठी काढले जाते. परंतु घर आणि दुकानात उलटे स्वस्तिक काढू नये. असे केल्याने अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात.


# वाकडे-तिकडे स्वस्तिक काढू नये 
स्वस्तिक अगदी सरळ आणि सुबक असावे. वाकडे स्वस्तिक शुभ मानले जात नाही. हे शुभ चिन्ह सुंदर, सरळ आणि स्पष्ट दिसेल असे काढावे.


# स्वस्तिकच्या जवळपास ठेवा स्वच्छता
घर किंवा दुकानात कुठेही काढण्यात आलेल्या स्वस्तिकजवळ स्वच्छता आवश्यक आहे. या ठिकाणी अस्वच्छता असल्यास अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात.


पुढील स्लाईडवर वाचा, स्वस्तिकशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...