Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Black Magic Sadhana place in india

काळी जादू आणि तंत्र साधनेसाठी प्रसिद्ध आहेत भारतातील हे 4 स्थान

रिलिजन डेस्क | Update - Jun 15, 2018, 04:24 PM IST

काळी जादू शब्द ऐकताच प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. यामध्ये किती सत्य आहे निश्चितपणे सांगणे अवघड आहे.

 • Black Magic Sadhana place in india

  काळी जादू शब्द ऐकताच प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. यामध्ये किती सत्य आहे निश्चितपणे सांगणे अवघड आहे. परंतु भारतात आजही काही ठिकाण काळ्या जादूसाठी प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हला भारतातील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.


  1. कोलकता येथील निमतला घाट
  बंगाल पूर्वीपासूनच काळ्या जादूचा गाढ मानला जातो. कोलकाता येथील निमताला घाटावर आजही तंत्र साधना केली जाते. येथे रात्री गुप्त पद्धतीने काळ्या जादूचा अभ्यास केला जातो. येथील स्मशान घाटावर अघोरी रात्री उशिरापर्यंत थांबतात.


  2. आसाममधील मायोंग
  आसामसुद्धा काळ्या जादूसाठी प्रसिद्ध स्थान आहे. तंर-मंत्रच्या बाबतीत आसाममधील मायोंग गाव नेहमी चर्चेत राहते. लोक या गावाचे नाव घ्यायलाही घाबरतात. हे गाव आसामची राजधानी गुवाहाटीपासून 40 किलोमीटर दूर आहे.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन ठिकाणांविषयी..

 • Black Magic Sadhana place in india

  3. वाराणसीचा स्मशान घाट
  वाराणसी भारताची धार्मिक नगर मानले जाते. येथे भारतातील सर्वात मोठा स्मशान घाट (मणिकर्णिका घाट ) आहे. असे सांगितले जाते की, येथील स्मशानातील राख कधीही थंड पडत नाही. वाराणसीतील स्मशान घाटावर अघोरी (तांत्रिक साधू) तंत्र साधना करतात. ही तंत्र साधना देवी-देवतांना खुश करण्यासाठी केली जाते. 

   

 • Black Magic Sadhana place in india


  4. कामाख्या मंदिर, आसाम
  आसाममधील गुवाहाटी येथे देवी कामाख्याचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दूरदूरवरून तांत्रिक साधना करण्यासाठी येतात. हे सिद्ध तंत्र साधना स्थान मानले जाते. नवरात्रीमध्ये येथे अघोरींचा मेळा लागतो. सर्व अघोरी वेगवेगळ्या पद्धतीने येथे साधनेत लीन होतात.

Trending