Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Conch Astrological Remedy to remove negative energy

संध्याकाळी पूजा करताना रोज वाजवावा शंख, घरात येणार नाही गरिबी आणि वाईट शक्ती

रिलिजन डेस्क | Update - May 07, 2018, 11:28 AM IST

अनेकवेळा आपल्या अपयशाचे कारण घरामध्ये असलेले निगेटिव्ह एनर्जी असू शकते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त

 • Conch Astrological Remedy to remove negative energy

  अनेकवेळा आपल्या अपयशाचे कारण घरामध्ये असलेले निगेटिव्ह एनर्जी असू शकते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यास कितीही कष्ट आणि प्रयत्न केले तरी मनासारखे फळ प्राप्त होत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार तुमच्यासोबतही असेच घडत असल्यास ज्योतिषाचे काही सोपे उपाय तुमच्या कामी येऊ शकतात. येथे जाणून घ्या, नकारात्मकता नष्ट करणारे काही सोपे उपाय.


  1. संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि शंखाने घरामध्ये पाणी शिंपडावे. दररोज घरामध्ये शंखाने पाणी शिंपडल्याने निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि दैवी शक्तींचा घरात वास राहतो. देवी लक्ष्मीला शंख अत्यंत प्रिय आहे. शंख घरात ठेवल्याने धन संबंधित अडचणी निर्माण होत नाहीत.


  2. रोज सकाळी एक वाटीभर पाणी सूर्यप्रकाशात ठेवावे. संध्याकाळी हे पाणी आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी घरामध्ये शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. दुर्भाग्यातून मुक्ती मिळेल.


  इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • Conch Astrological Remedy to remove negative energy

  3. कुटुंबातील एखाद्या सदस्याला रात्री वाईट स्वप्न पडत असतील तर झोपण्यापूर्वी कापूर तुपामध्ये टाकून जाळावा. असे केल्याने सर्व सदस्यांना शांत झोप लागेल आणि वाईट स्वप्नही पडणार नाहीत.


  4. रात्रीच्या वेळी झोपताना घराबाहेरील प्रत्येक कोपऱ्यात खडेमीठ काचेच्या वाटीत किंवा एखाद्या भांड्यात भरून ठेवा. सकाळी सर्व मीठ एकत्र करून पाण्यामध्ये प्रवाहित करा. असे केल्याने घरामध्ये सुख येते आणि अडचणी निघून जातात.

Trending