रविवारपूर्वी करा या / रविवारपूर्वी करा या 5 पैकी कोणताही 1 उपाय, देव दुर्गा पूर्ण करेल तुमची प्रत्येक इच्छा

Mar 22,2018 03:32:00 PM IST

तुम्हाला सर्व अडचणींमधून मुक्ती हवी असल्यास नवरात्रीमध्ये ज्योतिषचे उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. यासोबतच कामामध्ये येत असलेल्या अडचणी कमी होतात. सध्या चैत्र मासातील नवरात्री चालू असून 25 मार्चला रविवारी नवमी तिथी आहे. नवरात्र पूर्ण होण्यापूर्वी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा. यामुळे देवीची कृपा प्राप्त होऊ शकते.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

पहिला उपाय नवरात्रीमध्ये देवीला मध आणि अत्तर अवश्य अर्पण करावे. देवीला अर्पण केलेल्या अत्तराचा उपयोगही करावा. यामुळे वाईट दृष्टीपासून रक्षण होईल. मध अर्पण केल्याने भक्तांना सुंदर रूप प्राप्त होते.दुसरा उपाय नवरात्रीमध्ये देवी दुर्गाची पूजा करावी. देवीला लाल वस्त्र अवश्य अर्पण करावे. यासोबतच सौभाग्य सामग्री म्हणजे बांगड्या, कुंकू, वस्त्र, शृंगार साहित्य अर्पण करावे. या उपायाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.तिसरा उपाय नवरात्रीमध्ये स्थायी लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असल्यास विड्याच्या पानामध्ये सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून देवी दुर्गाला हे पान अर्पण करावे.चौथा उपाय नवरात्रीमध्ये दररोज देवी मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा. मंत्र-ऊँ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।पाचवा उपाय नवरात्रीमध्ये रोज सकाळी श्रीरामरक्षा स्तोत्राचे पाठ केल्याने प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते. श्रीरामरक्षा स्तोत्र पाठाने हनुमानही प्रसन्न होतात.
X