Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Dhan Prapti che Upay In Marathi

तांदळाचे 21 दाणे हळदीने पिवळे करून करा हा उपाय, खिशात येईल पैसा

रिलिजन डेस्क | Update - Apr 23, 2018, 04:24 PM IST

देवी-देवतांच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. यामध्ये तांदुळाचे विशेष महत्त्व आहे.

 • Dhan Prapti che Upay In Marathi

  देवी-देवतांच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. यामध्ये तांदुळाचे विशेष महत्त्व आहे. यालाच अक्षता असेही म्हणतात. प्रत्येक पूजेमध्ये गुलाल, हळद, कुंकू, अबीर अर्पण केल्यानंतर अक्षता अर्पण केल्या जातात. अक्षता नसल्यास पूजा अपूर्ण मानली जाते. अक्षता पूर्णतेचे प्रतीक आहे. येथे जाणून घ्या, तांदळाचे खास उपाय. हे उपाय उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांनी सांगितलेले आहेत.


  पहिला उपाय
  - कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. देवघरात महालक्ष्मीसमोर आसनावर बसावे.
  - तांदळाचे 21 दाणे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिळसून पिवळे करून घ्यावेत. सर्व दाणे अखंडित (न तुटलेले) असावेत.
  - त्यानंतर हे दाणे एखाद्या लाल रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून घ्यावेत.
  - त्यानंतर हे रेशमी वस्त्र लक्ष्मीसमोर ठेवून लक्ष्मीची आणि याची विधिव्रत पूजा करावी.
  - पूजा झाल्यानंतर ही सामग्री घराच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवावी.
  - या उपायाने धन संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल.


  इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Dhan Prapti che Upay In Marathi

  दुसरा उपाय
  - रोज सकाळी मूठभर तांदूळ मासे असलेल्या तलावामध्ये टाकावेत.
  - यासोबत कुलदेवतेकडे सर्व बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. धन प्राप्तीचे योग जुळून येतील.

 • Dhan Prapti che Upay In Marathi

  तिसरा उपाय
  खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल किंवा ऑफिसमध्ये वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर काही दिवस गोड भात तयार करून गायीला खाऊ घालावा.

Trending