Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Do Not Eat Curd At Night, Know Why

रात्री दही खाल्ल्याने कामी होते आयुष्य, या 4 गोष्टीही करू नयेत

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 09, 2018, 04:41 PM IST

जन्म आणि मृत्यू देवाच्या हातामध्ये आहे. केव्हा, कधी आणि कशामुळे तुमचा मृत्यू होईल, ही गोष्ट केवळ देवालाच माहिती आहे.

 • Do Not Eat Curd At Night, Know Why

  जन्म आणि मृत्यू देवाच्या हातामध्ये आहे. केव्हा, कधी आणि कशामुळे तुमचा मृत्यू होईल, ही गोष्ट केवळ देवालाच माहिती आहे. परंतु हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशी अनेक कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. गीताप्रेस गोरखपुर यांनी प्रकाशित केलेल्या संक्षिप्त गरुड पुराण अंकामध्ये मनुष्याचे आयुष्य कमी करणा-या 5 कामांबद्दल सांगण्यात आले आहे. ही पाच कामे पुढीलप्रमाणे आहेत...


  1- रात्री दही खाणे
  2- कोरड्या मांसाचे सेवन
  3-सकाळी उशीरापर्यंत झोपणे
  4- स्मशानातील धूर
  5- सकाळी व अत्यधिक मैथुन करणे


  रात्री दही खाणे -
  गरुड पुराणानुसार रात्री दह्याचे सेवन केल्याने देखील मनुष्याचे आयुष्य कमी होते. दह्याचे सेवन जरी मनुष्यासाठी फायद्याचे असले तरी रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता अधिक असते. उदा. पोटाशी संबंधीत रोग. आयुर्वेदात देखील रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन करण्यास मनाई आहे. कारण रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपले शरीर अधिक मेहनत करत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास उशीर लागतो. रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन करून झोपल्याने आणि ते व्यवस्थितरित्या न पचल्याने अनेक साइड इफेक्ट होण्यास सुरूवात होते. ज्यामुळे शरीरात अनेक रोगांची लागण होते. त्यामुळे रात्री झोपताना दह्याचे सेवन न केलेले केव्हाही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते.


  इतर कोणती कामे केल्यामुळे मनुष्याचे आयुष्य कशा प्रकारे कमी होत आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

 • Do Not Eat Curd At Night, Know Why

  कोरड्या (शुष्क) मांसाचे सेवन -
  गरुड पुराणानुसार शुष्क म्हणजे कोरडे मांसाचे सेवन करण्याने देखील मनुष्याचे आयुष्य कमी होते. ज्यावेळी मांस शिळे होते त्यावेळी ते कोरडे पडण्यास सुरूवात होते. यानंतर त्यावर अनेक प्रकारचे गंभीर बॅक्टेरिया व व्हायरसचे संक्रमण होते. ज्यावेळी असे मांस एखादी व्यक्ती खाते त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरात मांसासोबत बॅक्टेरिया आणि व्हायरस पोटात प्रवेश करून अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करण्यास सुरूवात करतात. या रोगांमुळे मनुष्याचे आयुष्य कमी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे कधीच कोरडे झालेले मांस सेवन करू नये.

 • Do Not Eat Curd At Night, Know Why

  सकाळी उशीरापर्यंत झोपणे -
  गरुड पुराणानुसार सकाळी उशीरापर्यंत झोपल्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होते. आयुर्वेदाच्या दृष्टिने पाहिल्यास पूर्ण दिकसाची अपेक्षा सकाळी ब्रह्म मुहूर्ताच्यावेळी शुद्ध हवा अधिक असते. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेसच्या हवेचे सेवन केल्याने शरीरातील अनेक रोग बरे होण्यास मदत होते. तसेच श्वसन तंत्र स्वस्थ राहते. सकाळी उशीरापर्यंत झोपल्याने ब्रह्म मुहूर्ताच्या शुद्ध हवेचे सेवन करणे शक्य होत नाही. त्यामुळे शरीरात अनेल रोग होण्यास सुरूवात होते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी सकाळी लवकर उठण्याचा नियम बनवला.

 • Do Not Eat Curd At Night, Know Why

  स्मशानातील धुर -
  गरुड पुराणानुसार स्मशानात देहाचे दाह संस्कार केले जाते. शरीर मृत झाल्यानंतर त्यावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया व व्हायरसचे संक्रमण होण्यास सुरूवात होते. दिवसभरातून असे अनेक मृतदेह स्मशानात अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. ज्यावळी या देहांवर दाह संस्कार केले जातात, त्यावेळी बॅक्टेरिया-व्हायरस त्या शरीरासोबत नष्ट होऊन जातात आणि तर काही धुराच्या माध्यमातून हवेत पसरले जातात.
  ज्यावेळी अशा प्रकारच्या धुराच्या संपर्कात एखादी व्यक्ती येते त्यावेळी हवेत पसरलेले हे बॅक्टेरिया-व्हायरस त्याच्या शरीराला चिटकून अनेक प्रकारचे रोग पसरवण्यास सुरूवात करतात. या रोगांमुळे मनुष्याचे आयुष्य कमी होण्याची भिती अधिक असते. त्यामुळे गरुड पुराणानुसार स्मशानातील धुरापासून लांब राहिले पाहिजे.

 • Do Not Eat Curd At Night, Know Why

  सकाळी व अत्यधिक मैथुन करणे -
  गरुड पुराणानुसार सकाळच्यावेळी मैथुन करणे अथवा अत्यधिक मैथुन करण्यानेदेखील मनुष्याचे आयुष्य कमी होते. धर्म ग्रंथांनुसार महापुरुषांनी सकाळच्यावेळी योग, प्राणायाम इत्यादींसाठी निश्चित केलेला आहे. यावेळी जर एखादा मनुष्य मैथुन (स्त्रीशी शारीरिक संबंध) ठेवत असेल तर त्याचे शरीर कमजोर होते. तसेच, अत्यधिक मैथुन करण्याने देखील शरीर कमजोर होत जाते. यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्यास सुरूवात होते आणि अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे गरुड पुराणानुसार सकाळच्यावेळी व अत्यधिक मैथुन केले नाही पाहिजे.

Trending