Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Do This Measure Of Goddess Lakshmi For Money

धन लाभासाठी देवी लक्ष्मीच्या चरणांवर लावावे या फुलाचे अत्तर

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 05, 2018, 10:46 AM IST

सध्याच्या काळात प्रत्येक लहान-मोठी गरज पूर्ण करण्यासाठी पैसा असणे फार आवश्यक आहे आणि ज्याप्रकारे महागाई वाढत आहे

 • Do This Measure Of Goddess Lakshmi For Money
  सध्याच्या काळात प्रत्येक लहान-मोठी गरज पूर्ण करण्यासाठी पैसा असणे फार आवश्यक आहे आणि ज्याप्रकारे महागाई वाढत आहे, त्या तुलनेत उत्पन्न फारच कमी आहे. काही लोकांचे तर उत्पन्नाचे सोर्सही स्थिर नाहीत. अशावेळी जीवन जगणे अवघड होऊन जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार काही साधारण उपाय करून उत्पन्नाचे सोर्स स्थिर केले जाऊ शकतात यासोबतच यामध्ये वाढही होते. हे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Do This Measure Of Goddess Lakshmi For Money

  उपाय-1
  शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर देवघरात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून विधिव्रत पूजा करावी. लक्ष्मीच्या चरणांवर केवड्याच्या फुलाचे अत्तर लावावे आणि खालील मंत्राचा 5 माळी जप करावा.


  ऊँ ह्लीं ऐं क्लीं श्री:

  त्यानंतर एखाद्या ब्राह्मण आणि कुमारिकेला जेवू घालावे. दक्षिणा, वस्त्र इ. भेट स्वरूपात द्यावे. त्यानंतर पूजा केलेली लक्ष्मीची मूर्ती, फोटो आपल्या देवघरात किंवा कार्यस्थळावर स्थापित करावी. या उपायाने थोड्याच दिवसात तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि धनाचे आगमन होईल.

 • Do This Measure Of Goddess Lakshmi For Money

  उपाय-2
  एखाद्या गुरुवारी एक पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा रुमाल घेऊन तुळस असलेल्या मंदिरात जावे. त्यानंतर तुळशीच्या जवळपास उगवलेले गवत तोडून त्या पिवळ्या कपड्यात बांधून घरी घेऊन यावे. हे गवत व्यापार ठिकाणी किंवा घरात ठेवावे. थोड्याच दिवसात व्यापारात वृद्धी आणि धनाची बरकत दिसू लागेल.

Trending