Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Do This Measures On shani Amawasya 17 March 2018

पितृ दोषाने त्रस्त असाल तर 17 मार्चला करा तूप-गुळाचा हा उपाय

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 17, 2018, 09:27 AM IST

आज (17 मार्च, शनिवार) फाल्गुन मासातील अमावस्या आहे. शनिवार आणि अमावास्येचा आज शुभ योग जुळून आला आहे

 • Do This Measures On shani Amawasya 17 March 2018

  आज (17 मार्च, शनिवार) फाल्गुन मासातील अमावस्या आहे. शनिवार आणि अमावास्येचा आज शुभ योग जुळून आला आहे. ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध व्रत करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने विशेष शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. येथे जाणून घ्या, अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता...


  - हिंदू धर्मामध्ये अमावास्येला पितरांची तिथी मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-यावर शुद्ध तूप आणि गुळाची आहुती द्यावी.


  अमावस्येचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Do This Measures On shani Amawasya 17 March 2018

  - अमावास्येच्या दिवशी प्राण्यांना जेवू घालावे. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर कणकीच्या गोळ्या तयार कराव्यात. गोळ्या तयार करताना देवाचे नामस्मरण करावे. त्यानंतर घराजवळील तलाव किंवा नदीजवळ जाऊन माशांना या गोळ्या टाकाव्यात. या उपायाने तुमच्या जीवनातील अडचणी समाप्त होतील.

 • Do This Measures On shani Amawasya 17 March 2018

  - अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी घरातील ईशान्य दिशेला गायीच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्यामध्ये कापसाच्या वातीऐवजी लाल धाग्याचा उपयोग करावा. दिव्यामध्ये थोडेसे केशर टाकावे. हा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सोपा उपाय आहे.

 • Do This Measures On shani Amawasya 17 March 2018

  अमावस्येच्या रात्री १० वाजता स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. उत्तर दिशेला तोंड करून आसनावर बसा. समोर एक चौरंग घेऊन एका ताटात स्वस्तिक किंवा ऊँ काढून त्यावर महालक्ष्मी यंत्र स्थापित करा. त्यानंतर एक शंख दुस-या ताटात स्थापीत करा. थोडे तांदूळ केशरात रंगवून ते त्या शंखात टाका. शुद्ध तुपाचा दिवा लावून खाली दिलेल्या मंत्राचा ११ माळ जप करा.

  मंत्र
  सिद्धि बुद्धि प्रदे देवि मुक्ति मुक्ति प्रदायिनी।
  मंत्र पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते।।


  जप झाल्यानंतर सर्व सामग्री नदीत किंवा तलावात विसर्जित करा. हा उपाय केल्याने थोड्या दिवसातच तुम्हाला अचानक धनलाभ होईल.

 • Do This Measures On shani Amawasya 17 March 2018

  अमावस्येच्या या शुभ योगामध्ये कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पाठ करावेत. शक्य असल्यास हनुमानाला चमेलीचे तेल अर्पण करावे. या उपायाने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Trending