एक नारळ आणि / एक नारळ आणि अशोकाच्या पानांनी नष्ट होऊ शकते घरातील नकारात्मक ऊर्जा

रिलिजन डेस्क

May 13,2018 12:42:00 PM IST

घरातील वातावरण नकारात्मक असल्यास कुटुंबातील सदस्यांचा स्वभाव चिडचिडा होतो किंवा ते आजारी राहतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे घरातील निगेटिव्ह एनर्जी. ही ऊर्जा घराजवळील अस्वच्छता किंवा नियमित पूजा-पाठ न केल्यामुळे वाढते. लोक घरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे निगेटिव्ह एनर्जीला प्रभाव वाढतो, यालाच काही लोक दृष्ट लागली असे म्हणतात.


तुमच्या घरातही नकारात्मक शक्तीचा प्रभाव असल्यास यावर सोपे उपाय करून मार्ग काढणे शक्य आहे. ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले काही छोटे-छोटे उपाय करून नकारात्मक ऊर्जा नष्ट केली जाऊ शकते. यासाठी कोणतीही मोठी पूजा किंवा कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. येथे जाणून घ्या, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे काही सोपे उपाय...


हे तीन उपाय करावेत...
1 -
अशोकाच्या झाडाची सात पाने घरी आणून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. त्यानंतर ही पाने देवघरात ठेवावीत. पाने सुकून गेल्यानंतर परत बदलावीत. या झाडाचे नावच अशोक म्हणेश सर्व शोक (दुःख) दूर करणारे आहे.


2 - एक नारळ घेऊन घरी यावर आणि हातामध्ये घेऊन संपूर्ण घरात फिरावे. त्यानंतर हे नारळ देवघरात ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ एखाद्या तलाव किंवा नदीमध्ये प्रवाहित करावे. मागे वळून न पाहता घरी निघून यावे.


3 - आठवड्यातून एकदा संपूर्ण घर मीठ टाकलेल्या पाण्याने पुसून घ्यावे. गुरुवारी घर पुसू नये.

X
COMMENT