तुमच्‍या चारित्र्याविषयी खुप / तुमच्‍या चारित्र्याविषयी खुप काही सांगतात हे इमोजी

तुमच्‍या चारित्र्याविषयी खुप काही सांगतात हे इमोजी.

Mar 09,2018 02:38:00 PM IST

ज्‍योतिष शास्‍त्रामधील सर्व 12 राशींना काहीना काही चिन्‍ह देण्‍यात आले आहे. जसे की, कर्क राशीला खेकडा, धनूष राशीला धनुष्‍याचे चिन्‍ह. प्रत्‍येक राशीच्‍या स्‍वभाप प्रवृत्‍तीनूसार हे चिन्‍ह देण्‍यात आले आहेत. मात्र जर या राशी चिन्‍हांना इमोजी देण्‍यात आले तर कोणत्‍या राशीला कोणते इमोजी मिळेल, याविषयी तुम्‍ही कधी विचार केला आहे का.


सोशल मिडीयावर किंवा व्‍हॉट्सअप मेसेज करताना आपण अनेकदा ज्‍या स्‍माईली, इमोजी वापरतो, त्‍या प्रत्‍येकाचा एक अर्थ असतो. आणि आपल्‍यालाही तो अर्थ समजत असतो. म्‍हणूनच आपण प्रसंगानूरूप इमोजी वापरतो. आपण आनंदी असू तर 'स्‍मायली' पाठवतो आणि राग आला तर लाल रंगाचा इमोजी पाठवतो.


कोणत्‍या राशीचिन्‍हाला कोणता इमोजी वापरावा हे एका संशोधनातून समोर आले आहे. प्रत्‍येक राशीच्‍या स्‍वभावानूसार त्‍या राशींना ते इमोजी देण्‍यात आले आहे. चला तर जाणून घेऊया मेष राशीपासून मीन राशीपर्यंत कोणत्‍या राशीचिन्‍हांना कोणते इमोजी देण्‍यात आले आहे.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणत्‍या राशीसाठी कोणते इमोजी निवडण्‍यात आले आहे...

मेष राशीसाठी स्मायली या इमोजीची निवड करण्यात आली आहे. कारण या राशीचे लोक नेहमी आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंदी ठेवतात.वृषभ राशीच्या व्यक्ती इतरांमध्ये सहज मिसळणारे नसतात. ते कोणाच्या जवळ गेले तरीही त्यापूर्वी फार विचार करतात. यामुळे यांना असा इमोजी देण्यात आला आहे, जो आपल्या भावनांना दाबवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे त्याच्या चेह-यावर कोणतेच भाव दिसत नाही.मिथून राशीसाठी स्मार्टनेस हा इमोजी निवडण्यात आला आहे. कारण हे लोक हुशार असतात आणि आपल्या बुद्धीमत्तेचा पुरपेर वापर करतात.कर्क राशीच्या व्यक्ती प्रत्यक्षात अत्यंत त्रस्त राहतात. त्यामुळे त्यांना हे इमोजी देण्यात आले आहे. ही त्यांची सवय आहे, असे नाही. मात्र परिस्थिती त्यांच्या विपरीत गेल्यास त्यांना फार त्रास होतो.सिंह राशीचे लोक नेहमी दिखावा आणि इतरांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी असा इमोजी निवडण्यात आला आहे, जो आनंदाचे संकेत तर देतो. मात्र ते खरे नसते.कन्या राशीचे लोक वरवर फार आनंदी दिसतात मात्र आतून ते अत्यंत दु:खी असतात. त्यांच्या मनात काय चालू आहे हे कोणालाही पटकन कळत नाही.संतूलित तराजूप्रमाणे तूळ राशीच्या व्यक्तीही संतूलित जीवन जगतात. यामुळे त्यांच्यासाठी असा इमोजी निवडण्यात आला आहे, जो फार आनंदीही नाही आणि दु:खीही नाही, फक्त शांत आहे.वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने अत्यंत चतूर असतात. जगाला आपला स्मार्टनेस दाखवण्यामध्येही ते मागे नसतात. ते फक्त दिखावाच करत नाही तर वास्तवातही ते बुद्धीमान असतात.धनू राशीचे लोक थट्टामस्करीसाठी ओळखले जातात. ते स्वत: त्रस्त असले तरी दुस-याच्या चेह-यावर हसू आणतात. त्यांना सेन्स ऑफ ह्युमर एवढा कमाल असतो की, एका क्षणात ते समोरच्याच्या ओठांवर हसू आणतात. यामुळे त्यांच्यासाठी असा इमोजी निवडण्यात आला आहे.मकर राशीच्या व्यक्ती अत्यंत गंभीर असतात. त्यांना सोपे जोक्सही पटकन कळत नाही. त्यांच्यासाठी आयुष्य ही गांर्भीयाने घेण्याची गोष्ट असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा इमोजी निवडण्यात आला आहे.कुंभ राशीचे लोक पाण्याच्या प्रवाहापणे असतात, जेथे दिशा मिळेल तिकडे ते वाहत जातात. त्यांच्यांशी समोरची व्यक्ती जशी वागते तेही तसेच वागतात. तुम्ही प्रेमाने बोललात तर तेही प्रेमाने बोलतात आणि तुम्ही इगो दाखवलात तर ते तुमच्यापेक्षा जास्त इगो दाखवण्यासही मागे राहत नाही. यामुळे त्यांच्यासाठी असा इमोजी निवडण्यात आला आहे, ज्याला पाहून मूडचा अंदाज लावता येऊ शकत नाही.मीन राशीचे लोक स्वत:ही आनंदी राहतात व इतरांनाही आनंदी ठेवतात. हे लोक सर्वांचे बेस्ट फ्रेंड असतात.
X