व्‍हॅलेंटाइन वीक: वाचा / व्‍हॅलेंटाइन वीक: वाचा टेडी बेअरच्‍या जन्‍माची गोष्‍ट..

व्‍हॅलेंटाइन वीक: वाचा टेडी बियरच्‍या जन्‍माची गोष्‍ट...व्‍हॅलेंटाइन वीक: वाचा टेडी बियरच्‍या जन्‍माची गोष्‍ट...व्‍हॅलेंटाइन वीक: वाचा टेडी बियरच्‍या जन्‍माची गोष्‍ट...व्‍हॅलेंटाइन वीक: वाचा टेडी बियरच्‍या जन्‍माची गोष्‍ट...

Feb 10,2018 05:40:00 PM IST

कपल्‍स व्‍हॅलेंटाइन वीकच्‍या या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. व्‍हॅलेंटाइन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्‍हणून साजरा केला जातो. मुलींना टेडी बेअर प्रचंड आवडतो. या दिवशी कपल्‍स आपल्‍या पार्टनरला टेडी गिफ्ट करुन आपले प्रेम व्‍यक्‍त करतात. मार्केटमध्‍ये आज सहजतेने अनेक प्रकारचे टेडी मिळतात. मात्र या बियरला टेडीच का म्‍हटले जाते, याविषयी आम्‍ही तुम्‍हाला येथे सविस्‍तर माहिती देत आहोत.

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, टेडी बियरच्‍या जन्‍माची सविस्‍तर गोष्‍ट...

टेडी बेअर अर्थात अस्वल. आज जगभरात हा टेडी बेअर प्रचंड लोकप्रिय आहे. याच्या जन्माची कथाही तितकीच मजेशीर आहे. या खेळण्याला हे नाव मिळाले, ते अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्या नावावरून. 1902 मधील नोव्हेंबर महिन्यात एकदा रुझवेल्ट मिसिसिपीच्या जंगलात अस्वलाच्या शिकारीसाठी गेले. तेथे इतरही अनेकजण शिकारीसाठी आले होते आणि त्यांनी अनेक प्राण्यांची शिकारही केली होती. रुझवेल्ट यांच्यासाठी काही अमेरिकन अस्वले बांधून ठेवली होती. मिसिसिपीच्या गव्हर्नरने त्यांना या अस्वलाची शिकार करण्याचे आमंत्रण दिले. मात्र, त्यांनी बांधलेल्या अस्वलास मारण्यास नकार दिला.या प्रसंगामुळे राजकीय टीकाकारांना चर्चेचा विषय मिळाला. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रात 16 नोव्हेंबर 1902 रोजी क्लिफोर्ड बेरिमॅन या व्यंगचित्रकाराचे यावर एक कार्टून प्रसिद्ध झाले.मॉरिस मिचटॉम या रशियन कँडी विक्रेत्याने हे कार्टून बघितले आणि त्याला या खेळण्याची कल्पना सुचली. त्याने एक छोटे अस्वल तयार केले आणि आपल्या दुकानात ठेवले आणि त्याला नाव दिले ‘टेडी बेअर’; त्याने हे बाहुले राष्ट्राध्यक्षांना पाठवले आणि त्यांनीही या नावास परवानगी दिली. हे टेडी बेअर लवकरच लोकप्रिय झाले आणि मॉरिस मिचटॉमने ‘आयडील नॉव्हेल्टी आणि टॉय’; ही खेळणी तयार करण्याची कंपनी काढली. त्याच वेळी र्जमनीमधील स्टेइफ नावाच्या खेळणी तयार करणार्या कंपनीने रिचर्ड स्टेइफ नावाच्या एका कलाकाराकडून अस्वलाच्या खेळणीचे एक डिझाइन तयार करून घेतले व एका प्रदर्शनात ते ठेवले. ते बघून न्यूयॉर्कच्या एका कंपनीने 3 हजार खेळण्यांची ऑर्डर दिली आणि मग हळूहळू हे टेडी बेअर जगभरातील मुलांच्या हाती दिसू लागले.सर्वांचा मित्र ‘कडले टेडी बेअर’; हे भव्य आकाराचे टेडी बेअर पोलंडची राजधानी वॉर्सा येथील एका शहरी भागात आहे. पोलंडच्या इझा रुटकोवास्का या कलावंताने ही कलाकृती साकार केली आहे. त्याचे ‘फॉर्म्स अँड शेप्स फाउंडेशन’; या नावाची एक संस्था आहे. ही संस्था सांस्कृतिक आणि सामाजिक जागृतीचे काम करत असते. रुटकोवास्काने लहानपणापासून टेडी बेअरला आपल्यावर प्रेम करणारा विश्वासू मित्र अशा स्वरूपात बघितले होते. त्याने ही संकल्पना साकारली आहे. या टेडी बेअरचे नाव ‘कडले’; असे आहे व हे इतके मोठे आहे की, याच्या अंगावर आपल्याला हवे तसे चढता येते व खेळता येते. या शहरातील लोक येता-जाता मनोसोक्तपणे याच्या बरोबर मस्ती करतात. जणू काही हा सर्वांचा खास असा मित्र आहे. असे करण्यास कोणालाही येथे अडवले जात नाही. विशेष म्हणजे हा टेडी बेअर शहरात एकाच ठिकाणी न राहता, तो विविध भागात जातो व लोकांना आनंद देतोजगातील सर्वाधिक किमतीत विकले गेलेले 10 टेडी बेअर्स 1लुइस व्ह्युटॉन टेडी बेअर किंमत: $ 2.1 दशलक्ष सन 2000 मध्ये मोनॅको येथील लिलावात याला ही विक्रमी किंमत मिळाली.टेडी गर्ल बेअर : $ 1,10,000 मूळ 1904 मधील हे टेडी बेअर 1994 मध्ये पुन्हा लिलावात विकले गेले.हॅपी टेडी बेअर : $ 1,01,556 2002 मध्ये र्जमनीतील एका मेळ्यात याला ही किंमत मिळाली.टायटॅनिक टेडी बेअर : $ 91,750 2002 मध्ये टायटॅनिक जहाजाच्या स्मरणार्थ याचा लिलाव झाला.रॉड बेअर पीबी-28 : $ 82,000 1904 मधील या टेडी बेअरचा 2001 मध्ये लिलाव करण्यात आला.हर्लेक्वीन टेडी बेअर : $ 60,000 1925 मध्ये तयार केलेले हे रंगीबेरंगी टेडी बेअर 1999 मध्ये लिलावात काढण्यात आले.एलिएट टेडी बेअर : $ 49,500 1908 मधील निळ्या रंगाच्या या टेडी बेअरचा 1993 मध्ये लिलाव झाला.हॉटवॉटर बॉटल टेडी बेअर : $ 31,200 1910 मधील फरचे जॅकेट घातलेले हे टेडी बेअर 2006 मध्ये विकले गेले.डिक्की टेडी बेअर : $ 26,400 1930 मधील या टेडीचा लिलाव 2007 मध्ये झाला.टेडी क्लाऊन बेअर : $ 23,500 1920 मध्ये तयार केलेले हे खेळणे 2007 मध्ये विकले गेले.
X