Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | holi celebration in india

भारतात होळीच्या विविध प्रथा, वाचा कुठे कोणत्या प्रकारे साजरी केली जाते

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 28, 2018, 10:12 AM IST

गुरुवार 1 मार्चला संपूर्ण भारतात होलिका दहन उत्सव साजरा होईल आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाईल.

 • holi celebration in india

  गुरुवार 1 मार्चला संपूर्ण भारतात होलिका दहन उत्सव साजरा होईल आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाईल. भारतात होळी सेलिब्रेशनसाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. कोरड्या रंगांपासून तर नाच-गाणे, डीजे आणि भांगसोबत होळीची फुल मस्ती भारतात आढळून येते. होळीच्या अशाच रंग आणि प्रथा देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाहावयास मिळतात. तुम्हीही या ठिकाणी जाण्याची प्लॅनिंग करून हा आनंद घेऊ शकता...


  1. मथुरा आणि वृंदावन-पारंपारिक होळी
  येथे कमीत-कमी 40 दिवस अगोदर म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवसापासूनच होळीची सुरुवात होते. खासकरुन येथील मंदिरांमध्ये ही होळी साजरी केली जाते. मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थळ आहे. तसेच वृंदावनमध्ये त्यांचे बालपन गेले आहे. येथील मंदिरात सकाळपासूनच होळी खेळणे सुरु होते. संध्याकाळपर्यंत ही होळी खेळली जाते. होळीचा हा आनंद घेण्यासाठी मथुरेच्या व्दारकाधीश मंदिरात अवश्य जा. येथे तुम्ही भांगचा देखील आनंद घेऊ शकता.


  होळीचे विविध उत्सव पाहण्यासाठी कोठे जाणे बेस्ट राहिल, हे जाणुन घ्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • holi celebration in india

  वाराणसी - लाठ्यांची होळी
  उत्तर प्रदेशाच्या मथुरे जवळच्या वाराणसीच्या पुरुषांसोबतच नंदगांवच्या महिला लाठ्यांसोबत होळी खेळतात. ज्याला लठमार होळीच्या नावाने ओळखले जाते. जवळपास 1 आठवडा हा होळीचा कार्यक्रम चालतो. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर खासकरुन होळीसाठी प्रसिध्द आहे. वाराणसीच्या या होळीत लांडूंचाही आनंद घेता येऊ शकतो. यामध्ये राधा-कृष्णाचे भक्तिमय गाणे वाजवले जातात आणि यावेळी एकमेकांना लाडूंनी मारले जाते.

 • holi celebration in india

  मुंबई - कम्युनिटी होळी
  मुंबईमधील सर्वात मोठा स्लम, धारवी. येथे होळी साजरी करण्याची एक वेगळीच पध्दत आहे. येथे धारावी कम्युनिटी तर्फे होळीची पार्टी ऑर्गनाइज केली जाते. येथे येऊन सेफ आणि फ्रेंडली पध्दतीने होळी खेळली जाऊ शकते. रंग खेळण्यासोबतच स्लम एरियाच्या लोकांना येथे गाण्यांवर थिरकताना पाहता येऊ शकते.

 • holi celebration in india

  शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल- सांस्कृतिक होळी
  पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतनमध्ये वसंत उत्सव म्हणजेच होळीची सुरुवात बंगाली कवि आणि लेखक रविंद्रनाथ टागोरने केली होती. ज्यामध्ये येथील स्टूडेंट्स रंग-बिरंगी कपडे घालतात. येथे येणा-या टूरिस्टचे विविध प्रकारचा डांस आणि नाटक करुन स्वागत केले जाते.

 • holi celebration in india

  जयपुर - हत्ती होळी
  जयपुरमध्ये होळीच्या वेळी हत्ती होळीचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये हत्तींची परेड, हत्तींसाठी ब्यूटी कॉन्टेस्ट, लोक नृत्य आणि हत्तींमध्ये रस्साकशी सारखे अने मनोरंजक खेळ खेळले जातात. जे पाहण्यासाठी भारता व्यतिरिक्त विदेशांतून देखील टूरिस्ट येतात.

 • holi celebration in india

  उदयपुर, रॉयल होळी
  रॉयल होळी पाहयची असेल तर उदयपुरमध्ये जाण्याचा प्लान करा. येथे होळीच्या दिवशी होलीका दहन केले जाते. यामागील मान्यता आहे की, येथे अनेक पाप आणि वाईट गोष्टींचा अंत होतो. होळीला अविस्मरणीय बनवण्यासाठी सिटी पॅलेस जवळ मानेक चौकमध्ये रॉयल फॅमिलीच्या होळी सेलिब्रेशनला जॉइन केले जाऊ शकते.

 • holi celebration in india

  पुरुलिया, पश्चिम बंगाल - लोक होळी
  पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये तीन दिवसांपर्यंत होळीचा उत्सव साजरा केला जातो. होळीच्या दिवशी याची एक वेगळीच मजा असते. गाणे म्हणत येथे होळी खेळली जाते. यासोतबच अनेक लोक कलांचा आनंद घेता येऊ शकतो. ज्यामध्ये चउ डांस सर्वात जास्त प्रसिध्द आहे. दरबारी झूमर, नटुआ डांस आणि त्यावर बाउल गायकांचे गाणे, सेलिब्रेशनचा आनंद दुप्पट करते. कोलकातापासून 5-6 तांसांचे अंतर पार करुन येथे पोहोचले जाऊ शकते. येथे राहण्यासाठी टेंटची सुविधा सहज मिळेल.

 • holi celebration in india

  आनंदपुर साहिब, पंजाब-वॉरियर होळी
  सिख स्टाइलमध्ये होळी खेळण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पंजाबच्या आनंदपुर साहिब जाण्याचा प्लान करा. सन 1701 पासुन येथे प्रत्येक वर्षी होला मोहल्ला मेळ्याचे आयोजन होते. अशा प्रकारची होळी खेलण्याची सुरुवात गुरु गोविंद सिंहने केली होती. याची खास गोष्ट म्हणजे या होळीत शिख लोक एकमेकांवर रंग फेकत नाही तर आपली फिजिकल स्ट्रेंथ पाहतात. ज्यामध्ये मार्शल आर्ट्स, तलवारबाजी, एक्रोबेटिक, मिलिट्री एक्सरसाइज आणि पगडी बांधण्यासारख्या गोष्टींचा समावेश असतो.

 • holi celebration in india

  दिल्ली-म्यूजिकल होळी
  दिल्लीमध्ये होळीच्या सेलिब्रेशनची एक वेगळीच मजा असते. रंगांसोबत लोक येथे डिजेच्या धुनवर थिरकतात. कोरडया रंगाव्यतिरिक्त पाण्याच्या रंगांनीही मजा-मस्ती केली जाते. या फेस्टीवलमध्ये भांगची लस्सी सर्वांची फेव्हरेट असते. 

 • holi celebration in india

  हम्पी-साउथ इंडिया
  होळीचा आनंद साउथ इंडियातही घेता येतो. येथे रंगांव्यतिरिक्त नाच-गाण्याचे आयोजन केले जाते. साउथ इंडियाच्या अन्य ठिकाणीही हे सेलिब्रेशन पाहिले जाऊ शकते. कर्नाटकाच्या हम्पीमध्ये होळीच्या दिवशी नाच-गाण्यांचा कार्यक्रम असतो. यासाठी खासकरुन विजय मंदिर प्रसिध्द आहे.

Trending