Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Holi 2018 che Upay, Holi che Upay

दुर्भाग्य दूर करण्यासाठी जुळून आला शुभ योग, होळीला करा फक्त हे 2 उपाय

यूटिलिटी डेस्क | Update - Feb 25, 2018, 12:02 AM IST

गुरुवार, 1 मार्चला होळी आहे. पंचांगानुसार फाल्गुन मासातील पौर्णिमा तिथीला होळी साजरी केली जाते.

 • Holi 2018 che Upay, Holi che Upay

  गुरुवार, 1 मार्चला होळी आहे. पंचांगानुसार फाल्गुन मासातील पौर्णिमा तिथीला होळी साजरी केली जाते. या पौर्णिमेला करण्यात आलेल्या उपायांचे फळ लवकर प्राप्त होते. ज्योतिषमध्ये होळीचे महत्त्व आहे. तुम्हाला तुमचे दुर्भाग्य दूर करण्याची इच्छा असल्यास गुरुवार आणि होळीचा शुभ योग जुळून येत आहे. गुरुवारचा स्वामी ग्रह गुरु भाग्य कारक आहे. यासोबतच होळीला भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार होळीला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.


  उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Holi 2018 che Upay, Holi che Upay

  धनलाभासाठी उपाय 
  होळीच्या रात्री एकाक्षी नारळ लाल कपड्यात बांधून घ्यावे. गव्हाच्या राशीवर हे नारळ ठेवावे. त्यानंतर नारळावर शेंदुराचा टिळा लावावा. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा जप 21 वेळा करावा. जप पूर्ण झाल्यानंतर नारळ बांधून ठेवलेले हे कापड दुकानात ग्राहकांची नजर जाईल अशा ठिकाणी बांधून ठेवावे. असे केल्याने धनलाभाचे योग जुळून येण्यास मदत होईल.

  मंत्र- ऊं श्रीं श्रीं श्रीं परम सिद्धि व्यापार वृद्धि नम:।

 • Holi 2018 che Upay, Holi che Upay

  कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी 
  - होळीच्या रात्री उत्तर दिशेकडे पांढर्‍या कपड्यावर मूग, हरभरा डाळ, तांदूळ , गहू, मसूर, काळे उडीद आणि तिळाच्या राशी (ढेरी) लावाव्यात. 
  - यानंतर त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करून केशराचा टिळा लावावा. तुपाचा दिवा लावून खाली दिलेल्या मंत्राचा स्फटिकाच्या माळेने जप करावा. 
  - जप पूर्ण झाल्यानंतर नवग्रह यंत्र पूजेच्या ठिकाणी स्थापित करावे. असे केल्याने ग्रह अनुकूल होण्यास सुरूवात होईल.


  मंत्र - ब्रह्मा मुरारी स्त्रीपुरान्तकारी भानु शशि भूमि-सुतो बुधश्च।
  गुरुश्च शुक्र शनि राहु केतव: सर्वे ग्रहा शांति करा भवंतु।।

Trending