​होळीच्या रात्री हे / ​होळीच्या रात्री हे 5 तांत्रिक उपाय केल्यास, हनुमान कृपेने उजळू शकते भाग्य

Feb 26,2018 02:51:00 PM IST
होळीच्या दिवशी करण्यात आलेले तंत्र शास्त्रामधील उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. यामुळे होळीच्या रात्री बहुतांश तांत्रिक तंत्र क्रिया करतात. या रात्रीसाठी तंत्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. यामुळे धनसंबंधित अडचणींमधून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेले तंत्र शास्त्राचे काही सोपे उपाय...होळीच्या दिवशी सूर्यास्तानंतर हनुमानाला अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी. या उपायाने सर्व बाधा दूर होऊ शकतात.होळीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर वडाच्या 11 किंवा 21 पानांना स्वछ धुवून त्यावर अष्टगंध किंवा चंदनाने श्रीराम लिहा. श्रीरामाचे नाव लिहिताना हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्यानंतर या पानांची माळ करून हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला ही माळ अर्पण करावी. हनुमानाला प्रसन्न करण्याचा हा प्राचीन उपाय आहे.होळीच्या रात्री हनुमानाला लाल वस्त्र अर्पण करावे. वस्त्र अर्पण करताना चमेलीचे तेल, शेंदूर इ. शृंगाराच्या वस्तूंचा उपाय केला जातो. हनुमानाचा शृंगार झाल्यानंतर मंदिरात बसून श्रीराम नामाचे स्मरण करावे. वस्त्र अर्पण केल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसाचे पाठ करावेत. या उपायाने सर्व अडचणी दूर होतील.होळीच्या रात्री हनुमानाला एक विशेष पान अर्पण करा. या पानामध्ये केवळ कात, गुलकंद, बडीशेप, बारीक खोबरे आणि सुमन कतरी टाकावी. पान बनवताना त्यामध्ये चुना, सुपारी, तंबाकू टाकू नये. हनुमानाची विधिव्रत पूजा केल्यानंतर हे पान हनुमानाला अर्पण करावे.हनुमान पूजेनंतर मूर्तीजवळील गुलाबाचे एक फुल घेऊन घरी यावे. हे फुल लाल कपड्यात बांधून घरात ठेवावे. यामुळे घराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही.
X