Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | How To Get Rid Of Diseases From Upay Of Goddess Mahakali

आजार आणि अडचणींमुळे त्रस्त असाल तर शुक्रवारी करा महाकालीचा हा उपाय

रिलिजन डेस्क | Update - May 18, 2018, 12:38 PM IST

देवी दुर्गाच्या नऊ स्वरूपांमधील एक आहे देवी महाकाली. हे दुर्गाच्या रौद्र अवताराचे रूप आहे. देवी कालीच्या उपासनेने घरातील

 • How To Get Rid Of Diseases From Upay Of Goddess Mahakali

  देवी दुर्गाच्या नऊ स्वरूपांमधील एक आहे देवी महाकाली. हे दुर्गाच्या रौद्र अवताराचे रूप आहे. देवी कालीच्या उपासनेने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये दीर्घकाळापासून कोणी आजारी असेल किंवा अडचणी असल्यास देवी कालीची उपासना श्रेष्ठ उपाय आहे. देवी कालीला अशा समस्यांचे संहारक मानले गेले आहे. देवतासुद्धा ज्या गोष्टींचा वध करू शकत नाहीत अशा सर्व समस्यांचा संहार देवी काली करते.


  सामान्यतः देवी कालीची उपासना नवरात्रीमध्ये केली जाते. ही तंत्रची देवी आहे. देवीचे हे रौद्र रूप असल्यामुळे यांचा फोटो फार कमी लोक घरामध्ये लावतात. हरिद्वारचे तंत्र साधक योगेश्वरानंद महाराज यांच्यानुसार देवी-देवतांच्या उग्र स्वरूपाचे फोटो घरामध्ये लावले जात नाहीत, परंतु देवी कालीचा फोटो किंवा मूर्ती घरात न ठेवताही तुम्ही या देवीची उपासना करू शकता. देवी कालीच्या उपासनेने घरातील आजार आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आजार आणि निगेटिव्ह एनर्जी नष्ट करणारा उपाय...

 • How To Get Rid Of Diseases From Upay Of Goddess Mahakali

  1 - घरामध्ये आजार आणि अडचणींचे वास्तव्य असल्यास देवी कालीची उपासना करावी.

  2 - शुक्रवारी देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो देवघरात स्थापित करावा.

  3 - देवी दुर्गाचे विधिव्रत पूजन करावे.

  4 - देवीला तुपाचा दिवा लावावा आणि महाकालीचे ध्यान करावे.

  5 - गुगुळ धूप द्यावी आणि महाकालीचे मनातल्या मनात नामस्मरण करावे.

  6 - त्यानंतर 108 मण्यांच्या माळेने 'क्रीं' मंत्राचा जप करावा.

  7 - रोज सकाळी आणि संध्याकाळी महाकालीचे ध्यान करत  'क्रीं' मंत्राचा जप करावा.

  यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी आणि आजार दूर होऊ शकतात.

Trending