Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | 27 June history events in marathi

27 June : आजच्याच दिवशी समजले होते की सिगारेटमुळे होतो कँसर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 27, 2018, 01:05 PM IST

इतिहासामध्ये अनेक घटना दडलेल्या असून यामधील काही घटनांचा संबंध 27 जूनशी आहे. वर्ष 1957 मध्ये 27 जून रोजी ब्रिटनच्या

 • 27 June history events in marathi

  इतिहासामध्ये अनेक घटना दडलेल्या असून यामधील काही घटनांचा संबंध 27 जूनशी आहे. वर्ष 1957 मध्ये 27 जून रोजी ब्रिटनच्या मेडिकल रिसर्च काऊन्सिलने 25 वर्षांच्या शोध आधारावर एक रिपोर्ट प्रसिद्ध करून सांगितले की धुम्रपानामुळे फुफ्फुसांचा कँसर होतो. वर्ष 1964 मध्ये 27 जून रोजीच दिल्लीतील तीन मूर्ती भवनात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवले जाईल असा निर्णय घेण्यात आला. 27 जूनच्या दिवशी इतिहासातील इतर काही खास प्रमुख घटनांची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.


  27 जून 1693 : लंडनमध्ये महिलांसाठी पहिले मॅगझीन 'लेडीज मर्क्युरी' चे प्रकाशन झाले.


  27 जून 1838 : राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिम चंद्र चट्टोपाध्‍याय यांचा जन्म.


  27 जून 1867: बँक ऑफ कॅलिफोर्नियाचे संचालन सुरु.


  27 जून 1893: शीख साम्राज्याचे संस्थापक पंजाबचे महाराज रणजित सिंह यांचे निधन.


  27 जून 1914: अमेरिकेने इथोपियासोबत वाणिज्य संधी करारावर स्वाक्षरी केली.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आजच्या दिवशी घडलेल्या इतर काही ऐतिहासिक घटना...

 • 27 June history events in marathi

  27 जून 1940 : सोवियत सैन्याने रोमानियावर हल्ला केला.


  27 जून 1957 : ब्रिटनच्या मेडिकल रिसर्च टीमने सांगितले की धुम्रपानामुळे फुफ्फुसांचा कँसर होऊ शकतो.


  27 जून 1964 : तीन मूर्ती भवनला नेहरूंचे संग्रहालय बनवण्यात आले. 


  27 जून 1967 : लंडनच्या एनफील्ड येथे जगातील पहिले एटीएम स्थापित करण्यात आले.


  27 जून 1967 : भारतामध्ये निर्मित पहिले यात्री विमान एचएस 748 इंडियन एअरलाईन्सला दिले गेले.

 • 27 June history events in marathi

  27 जून 2002 : जी-8 देश अण्वस्त्र हत्यार नष्ट करण्याच्या रशियन योजनेवर सहमत.


  27 जून 2003 : संयुक्त राज्य अमेरिकेत समलैंगिकतावर प्रतिबंध रद्द.


  27 जून 2005 : ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे व्हिटो रहित स्थायी सदस्यतेचे समर्थन केले.


  27 जून 2008 : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे चेअरमन बिल्ट गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Trending