Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Astro Tips About Negativity In Home

हे 4 काम केल्यास घरावर पडणार नाही कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव

रिलिजन डेस्क | Update - May 25, 2018, 12:29 PM IST

काही लोकांसोबत असे घडते की, सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानकच वाईट काळ सुरु होतो.

 • Astro Tips About Negativity In Home

  काही लोकांसोबत असे घडते की, सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानकच वाईट काळ सुरु होतो. काम बिघडू लागते. धनहानी सुरु होते. कुटुंबात अचानक एखादा सदस्य वारंवार आजारी पडत राहतो. योग्य उपचार करूनही औषधींचा प्रभाव दिसून येत नाही. या संदर्भात अशी ज्योतिषीय मान्यता आहे की, वाईट नजर, दृष्ट लागल्यामुळे किंवा वास्तू दोषामुळे अशाप्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


  # पहिला उपाय
  घराला कोणाची दृष्ट लागली असेल किंवा इतर कोणताही दोष असल्यास पिवळी मोहरी, गुगुळ, लोबान आणि गायीचे तूप एकत्र करून घ्यावे. रोज सूर्यास्तानंतर या गोष्टी जाळून संपूर्ण घरात याचा धूर करावा. हा उपाय सलग 21 दिवस केल्यास याच्या शुभ प्रभावाने घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते.


  # दुसरा उपाय
  रोज सकाळी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. गोमूत्राच्या तीव्र गंधाने सर्वप्रकारची नकारात्मकता दूर होऊ शकते.


  पुढील स्लाईडवर वाचा, इतर दोन उपाय...

 • Astro Tips About Negativity In Home

  # तिसरा उपाय
  घरामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. ज्या घरांमध्ये अस्वच्छता राहते, तेथे नकारात्मकता लवकर पसरते. सकाळीच संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यावी. घरातील वातावरण सुगंधित ठेवावे.


  # चौथा उपाय 
  वाईट नजर, दृष्टपासून दूर राहण्यासाठी कोणत्याही मासातील शुक्ल पक्षातील बुधवारी 4 गोमती चक्र घेऊन यावेत आणि स्वतःवरून 11 वेळेस उतरवून घ्यावेत. त्यानंतर हे गोमती चक्र घराबाहेर चारही दिशांना फेकून द्यावेत. गोमती चक्राचा उपयोग तंत्र क्रियांमध्ये विशेष रूपात केला जातो.

Trending