अडकलेला पैसा परत / अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी रोज सकाळी 21 दिवस करा हा 1 उपाय

May 13,2018 11:56:00 AM IST

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही अडचणी अवश्य असतात. या अडचणींमधून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती शर्थीचे प्रयत्न करतो. यामध्ये काही लोकांना यश प्राप्त होते तर काहींच्या पदरी अपयश पडते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार काही सोपे उपाय करून या अडचणींमधून मार्ग काढणे शक्य आहे. येथे जाणून घ्या, असेच काही खास उपाय...


अडकलेला पैसा मिळवण्यासाठी
शुक्ल पक्षाच्या एखाद्या सोमवारपासून हा उपाय सुरु करून सलग 21 दिवस करा. सकाळी लवकर उठा, स्नान करुन एका तांब्यात पाणी घेऊन त्यात 5 गुलाबाची फुले टाका आणि सूर्यदेवाला या पाण्याने अर्घ्य द्यावे. सूर्यदेवकडे तुमची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. या उपायाने तुमचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

यश प्राप्तीसाठी कोणत्याही बुधवारी सूर्यदेवाकडे मुख करून नमस्कार करावा. त्यानंतर एक दोरा घेऊन खालील मंत्राचा उच्चार घेऊन सात गाठी माराव्यात. त्यांनतर हा दोरा तावीजमध्ये बांधून गळ्यात हे तावीज घालावे. प्रत्येक बुधवारी तावीजची धूप-दीप दाखवून पूजा करावी. या उपायाने तुम्हाला कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. मंत्र- ऊं गं गणपतये नम:सुख-समृध्दीसाठी... तुळशी नामाष्टक मंत्राचा जप करा वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।। एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम। य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।। जप विधी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि तुळशीची पूजा, परिक्रमाकरुन दिवा लावा. यानंतर एकांतात कुश आसनावर बसून तुळशीच्या माळेने या मंत्राचा जप करा. मंत्राचा जप करताना मुख पुर्व दिशेला असावे. कमीत कमी 5 माळा जप अवश्य करा.
X