Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Astrological Remedies for Husband and Wife

पती-पत्नीमध्ये रोज वाद होत असल्यास करा या 7 पैकी कोणताही 1 उपाय

रिलिजन डेस्क | Update - Jun 03, 2018, 03:35 PM IST

पती-पत्नीमध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे कारण जेथे प्रेम असते तेथे वादही अवश्य असतात.

 • Astrological Remedies for Husband and Wife

  पती-पत्नीमध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे कारण जेथे प्रेम असते तेथे वादही अवश्य असतात. परंतु कधीकधी हे वाद गरजेपेक्षा जास्त वाढून नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात. याचा प्रभाव कुटुंबातील इतर सदस्यांवर पडतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अशा स्थितीमध्ये काही सोपे ज्योतिषीय उपाय करून मार्ग काढला जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे उपाय...


  1. पत्नीने प्रत्येक शुक्रवारी तांदुळाची खीर करावी आणि याचा नैवेद्य देवाला दाखवावा. त्यानंतर पती-पत्नीने दोघांनी एकत्र बसून खीर खावी. यामुळे वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते.


  2. पतीचा स्वभाव खूप रागीट असल्यास पत्नीने रोज एखाद्या शिव-पार्वती मंदिरात लाल फुल अर्पण करावे.


  3. कण्हेरीचे फुल पाण्यात उगाळून याचा कपाळावर टिळा लावल्यास पती-पत्नीमधील प्रेम वाढू शकते.


  4. पती-पत्नीने एकत्रितपणे महादेव आणि पार्वतीची पूजा करावी. यामुळे दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त होऊ शकते.


  5. पती-पत्नी दोघांनीही प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन पिवळे रेशमी वस्त्र, पिवळे फळ आणि मिठाई अर्पण करावी.


  6. पती-पत्नीने रोज केळीच्या झाडाला जल अर्पण करावे किंवा केळीचे मूळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून उजव्या हातावर बांधावे. वैवाहिक जीवन सुखी करण्याचा हा प्रभावी उपाय आहे.


  7. काहीवेळा घरातील निगेटिव्हिटीमुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात. या नकारात्मक प्रभावापासून दूर राहण्यासाठी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे.

Trending