Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Astrology Measures For Success In Interview

इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी करा हा सोपा उपाय, मिळू शकते सक्सेस

रिलिजिन डेस्क | Update - Apr 21, 2018, 11:52 AM IST

इंटरव्ह्यूचे नाव ऐकताच सर्वांना घाम फुटतो. सर्वांच्या मनात एकाच प्रश येतो इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार.

 • Astrology Measures For Success In Interview

  इंटरव्ह्यूचे नाव ऐकताच सर्वांना घाम फुटतो. सर्वांच्या मनात एकाच प्रश येतो इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार. त्या प्रश्नाचे उत्तर मला सांगता येईल का नाही. यामुळे इंटरव्ह्यूला सुरुवात होण्याआधीच सर्वजण नर्वस असतात. जर तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार आहात आणि तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे तर खाली दिलेला उपाय करा.


  शुभ दिवस पाहून सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या सुती आसनावर पूर्व दिशेला मुख करून बसा. समोर पिवळा कपडा अंथरून त्यावर 108 मण्यांची स्फटिकाची माळ ठेवून त्यावर केशर आणि अत्तर अर्पण करून पूजा करा.
  पूजा झाल्यानंतर धूप-दीप दाखवून खालील मंत्राचा 31 वेळेस जप करावा. अशाप्रकारे 11 दिवस हा उपाय केल्यास माळ सिद्ध होईल. ही माळ धारण करून इंटरव्ह्यूला जावे. हा उपाय केल्याने इंटरव्ह्यूमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल.
  मंत्र
  ऊँ ह्लीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धि कुरु कुरु फट् स्वाहा।


  दुसरा उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • Astrology Measures For Success In Interview

  ज्या दिवशी इंटरव्ह्यू किंवा एखाद्या खास कामासाठी घराबाहेर जायचे असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करावी. श्रीगणेशाला फुल, दुर्वा अर्पण कराव्यात. गूळ-धन्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीगणेशासमोर बसून रुद्राक्षाच्या माळेने ऊं गं गणपतये नम: मंत्राचा जप करावा. घराबाहेर पडताना श्रीगणेशाला अर्पण केलेल्या दुर्वामधील थोड्या दुर्वा खिशात ठेवा. या उपायाने तुम्हाला कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते.

Trending